~ ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले; लक्ष्य दरात ९१५ रुपयांपर्यंत वाढ ~
मुंबई, १० जून २०२२: भारतातील आघाडीची पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने मागील उत्पन्न निकालांत दमदार कामगिरी केल्यामुळे ती आता जागतिक ब्रोकरेज फर्म्सच्या नजरेत भरली आहे. जेपी मॉर्गननंतर आता ब्रोकरेज फर्म सिटीनेही पेटीएमच्या वाढीच्या व नफ्यात येण्याच्या योजनांवर विश्वास व्यक्त केला आहे, पेटीएमच्या उत्पन्नात स्थिर सुधारणा होईल तसेच वित्तीय सेवांचा आवाका जलद गतीने वाढेल असे सिटीने म्हटले आहे. ‘पेमेंट्समधून उत्पन्न निर्माण करण्यात तसेच वित्तीय सेवांचा आवाका वाढवण्यात पेटीएम स्थिर सुधारणा दाखवत आहे,’ असे सिटीने पेटीएमसाठीच्या नवीन विश्लेषण टिपणात नमूद केले आहे.
या ब्रोकरेज फर्मने पेटीएम समभागाला दिलेले कव्हरेज ‘बाय’ रेटिंगसह कायम ठेवले आहे आणि लक्ष्य किंमत ९१५ रुपये केली आहे. यामुळे अपसाइड संभाव्यता ४८ टक्के झाली आहे. ‘पेटीएमचा निश्चित कामकाज खर्च (ऑपेक्स) आर्थिक वर्ष २३-२४मध्ये अर्थपूर्णरित्या कमी होईल; त्यामुळे आर्थिक वर्ष २५ मध्ये समायोजित ईबीआयटीडीए ब्रेकइव्हनला चालना मिळेल.’ पेटीएमचे मूल्यांकनही या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत वाजवी आहे, असे सिटीला वाटते.

सिटीने पेटीएमचे कव्हरेज एप्रिल २०२२ मध्ये ‘बाय’ रेटिंग व ९१० रुपये लक्ष्य किंमतीसह सुरू केले होते याची येथे नोंद घेतली पाहिजे.
सिटीने नुकत्याच केलेल्या पेटीएमच्या मूल्यमापनातून असे दिसून येते की, महत्त्वाच्या व्यवसाय विभागांमधील दमदार कामगिरी व खर्च कमी करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, जागतिक ब्रोकरेज फर्म्सचा कंपनीला पाठिंबा कायम आहे. या ब्रोकरेज फर्मने कंपनीच्या आर्थिक वर्ष २२च्या अखेरच्या तिमाहीतील वित्तीय निकालांतून तीन महत्त्वपूर्ण अंगांची नोंद घेतली- पेमेंट्समधील दमदार वाढ, कर्जपुरवठ्याच्या व्याप्तीत झपाट्याने वाढ व काँट्रिब्युशन मार्जिनमध्ये सुधारणा.
पेटीएमची एकंदर मार्जिन्स दमदारपणे वाढत आहेत, याला व्यापारी व ग्राहक अशा दोन्ही बाजूंनी येणाऱ्या एकंदर उत्पन्नवाढीतील स्थिर सुधारणेमुळे बळ मिळाले आहे, असे ब्रोकरेज फर्मने नमूद केले. याशिवाय वित्तीय सेवांची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे, कारण, कंपनीने दमदार अपसेलिंग व भागीदारींचा विस्तार यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अखेरीस, आर्थिक वर्ष २३ मध्ये कामकाजातील लाभ अधिक दृश्यमान होतील व पेटीएमचे काँट्रिब्युशन मार्जिन सातत्याने सुधारत राहील, यावर सिटीने प्रकाश टाकला आहे.
पेटीएमचा एकंदर नफा व काँट्रिब्युशन मार्जिन्स पुढील काही आर्थिक वर्षांमध्ये दमदार वाढ साध्य करतील, असे सिटीला अपेक्षित आहे. ‘पेटीएमचा एकूण नफा आर्थिक वर्ष २२ ते २६ या काळात ३७ टक्के सीएजीआरवर वाढेल असे आम्हाला अपेक्षित आहे, तर काँट्रिब्युशन मार्जिनही आर्थिक वर्ष २६पर्यंत ३० टक्क्यांवरून ३९ टक्क्यांवर विस्तारणार (आर्थिक वर्ष २४ मध्ये ३७ टक्के) आहे,’ असे सिटीने म्हटले आहे.
नुकतेच ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने पेटीएमच्या नफा मार्जिन काँट्रिब्युशनमधील सुधारणेवर व अप्रत्यक्ष खर्चांतील घटीवर प्रकाश टाकला होता. पेटीएमच्या नफ्यात येण्याच्या मार्गावरील प्रवासाला पाठिंबा देत या फर्मने पेटीएम समभागाला ‘ओव्हरवेट’ रेटिंग पुन्हा दिले होते व मार्च २०२३साठी १,००० रुपये किंमतीचे लक्ष्य ठेवले होते.

उत्पन्नाच्या स्रोतांबाबत पेटीएम प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत सरस आहे, असेही या ब्रोकरेज फर्मने म्हटले होते. पेमेंट्स, वाणिज्य व वित्तीय सेवा असे अनेक स्रोत कंपनीकडे आहेत आणि त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी ग्राहक संपादन खर्चामध्ये (सीएसी) ‘उत्पन्न व नफ्याला चालना देण्याची अनन्यसाधारण क्षमता’ पेटीएमकडे आहे, असेही फर्मने म्हटले होते.




