29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeठळक बातम्यापेटीएमवर दैनंदिन फ्लाइट तिकिट बुकिंग्जमध्ये मोठी वाढ

पेटीएमवर दैनंदिन फ्लाइट तिकिट बुकिंग्जमध्ये मोठी वाढ

~ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रवासासाठी मागणीत वाढ ~

मुंबई, २५ मे २०२२: भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमचा मालकीहक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज घोषणा केली की, जागतिक स्तरावर हवाई प्रवासावरील निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासामध्ये झालेल्या वाढीमुळे पेटीएम अॅपच्या माध्यमातून फ्लाइट तिकिट बुकिंग्ज करण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.

कंपनीने आपल्या अॅपच्या माध्यमातून हवाई प्रवास तिकिटिंगसाठी रोचक ट्रेण्ड्स सांगितले. जानेवारीच्या मध्यापासून एप्रिल २०२२ पर्यंत पेटीएम अॅपवर विमानभाडे वाढत असताना देखील दररोज बुकिंग करणाऱ्या ग्राहकांच्या आकडेवारीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ दिसण्यात आली. तसेच तिकिट रद्द करण्यामध्ये मोठी घट झाली, जेथे जानेवारीच्या मध्यकाळात तिकिट रद्द करण्याचे प्रमाण २२ टक्क्यांवरून सद्यस्थितीत ६ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. तसेच पेटीएम अॅपवरील किमान ३५ टक्के दैनंदिन तिकिट बुकिंग्जच्या प्रवासाच्या तारखा १५ दिवसांनंतर आहेत, हे प्रमाण जानेवारीमध्ये २३ टक्के होते. यामधून प्रबळ ग्राहक आत्मविश्वास दिसून येतो.

कंपनीला जानेवारी ते एप्रिलदरम्यान देशांतर्गत लेजर प्रवासासाठी उच्च मागणी दिसण्यात आली, जेथे गोवा व पोर्ट ब्लेअर यांसारख्या लोकप्रिय गंतव्यांसाठी फ्लाइट तिकिट बुकिंग्जमध्ये अनुक्रमे १५० टक्के व ३०० टक्के वाढीची नोंद झाली.

मार्च अखेरपासून जागतिक प्रवास सुरू होण्यासह पेटीएम अॅपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय फ्लाइट तिकिट बुकिंग्जमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि दर आठवड्याला सतत ३० टक्क्यांची वाढत दिसून येत आहे. रोचक बाब म्हणजे मे पर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दैनंदिन बुकिंग्ज वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या बुकिंग्जच्या तुलनेत ४ पट आहेत.

पेटीएम अॅपवरील फ्लाइट तिकिट बुकिंग्जनुसार अव्वल तीन आंतरराष्ट्रीय गंतव्य आहेत- यूएई, थायलंड व नेपाळ. खरेतर, कंपनीने फेब्रुवारीच्या मध्यकाळापासून बँकॉक व फुकेतसाठी बुकिंग्जमध्ये ६ पट वाढीची नोंद केली आहे; दरम्यान सिंगापूर, इंडोनेशिया व मलेशिया यांसारख्या इतर लोकप्रिय गंतव्यांसाठी देखील अशाच प्रकारची मागणी दिसून येत आहे.

ग्राहकांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पेटीएम आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटी, एचएसबीसी, बँक ऑफ बडोदा इत्यादी सारख्या प्रमुख बँकांसोबत सहयोगाने फ्लाइट तिकिट बुकिंग्जवर जवळपास १५ टक्के सूट देत आहे.

पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, “आम्हाला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ग्राहक मागणीमध्ये वाढ होण्यासह फ्लाइट तिकिट बुकिंग्जमध्ये जलद रिकव्हरी दिसण्यात आली आहे. या गतीला कायम ठेवण्यासाठी आणि आमच्या युजर्सना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही पेटीएम अॅपच्या माध्यमातून फ्लाइट तिकिट बुकिंग्जवर अनेक उत्साहवर्धक ऑफर्स व सूट दिली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]