23.5 C
Pune
Saturday, June 21, 2025
Homeठळक बातम्या*पोद्दार हॉस्पिटलचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

*पोद्दार हॉस्पिटलचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

शेकडो रुग्णांनी घेतला उपचार व सवलतीचा लाभ उत्कृष्ट  आरोग्यसेवेचा यज्ञ अखंडितपणे चालवणाऱ्या डॉ. अशोक पोद्दार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

 लातूर : मराठवाड्यातील एकमेव एनएबीएच व आयएसओ प्रमाणित ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असणाऱ्या पोद्दार हॉस्पिटलचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार डॉ. अशोक पोद्दार यांच्या नेहमीच्या कार्यपध्दतीप्रमाणे ५० टक्के सवलतीच्या दरात  करण्यात आल्या. शेकडो रुग्णांनी या सवलतीचा लाभ घेतला. लातूर येथील अस्थिशल्य  चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांचे पोद्दार हॉस्पिटल हे खाजगी क्षेत्रातील एक अत्याधुनिक व विश्वसनिय  ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ. पोद्दार यांनी आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

आजपावेतो १५० पेक्षा जास्त मोफत व यशस्वी आरोग्य शिबिरांचे आयोजन या हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. मराठवाड्यातील पहिले अत्याधुनिक फ्लॅट पॅनल सीआर्म मशीन या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून विशेष प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्ग, डी.आर. सिस्टिमसह अत्याधुनिक एक्सरे मशीन, मॉड्यूलर  ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी डिपार्टमेंट अशा विविध सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. मागच्या सलग २३ वर्षांपासून डॉ.अशोक पोद्दार पोद्दार हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्या सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटलचा, नूतन इमारतीचा दहावा वर्धापन दिनही यादिवशी हर्षोल्हासात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशाचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून साधेपणाने हॉस्पिटलचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.                यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी डॉ.अशोक पोद्दार यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याचा गौरव करून त्यांच्याकडून भविष्यात यापेक्षाही चांगली रुग्णसेवा घडावी,अशी शुभेच्छा दिल्या. डॉ.पोद्दार यांच्या आरोग्य व सामाजिक कार्याबद्दल आपण ऐकून होतो, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आवाकाही पाहायला मिळाला,अशी प्रतिक्रिया देवरे यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांनीही डॉ.अशोक पोद्दार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. डॉ.अशोक पोद्दार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मागच्या सलग २३ वर्षांपासून पोद्दार हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अखंडितपणे रुग्ण सेवा करत असल्याचे सांगितले. रुग्णांना या क्षेत्रातली चांगल्यात चांगली सेवा – सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला अधिक भर असतो. लातूर व परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारासाठी अन्य शहरात जायला लागू नये यासाठी आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून रुग्ण सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस रुग्णांना अस्थिरोग तपासणी, डिजिटल एक्सरे, रक्त तपासणी फिजिओथेरपी करीता ५० टक्के सवलत देण्यात आली.  तर एमआरआय, सिटीस्कॅन, युएसजी  वर  २५ टक्के सूट देण्यात आली होती. या तीन दिवसात २२५ रुग्णांची  तपासणी करण्यात आली.  त्यात ९३ रुग्णांचे  एक्सरे काढण्यात आले. ७८ रुग्णांची  रक्त तपासणी करण्यात आली. १८० रुग्णांची  हाडांच्या ठिसूळतेची मोफत तपासणी केली गेली. १५० रुग्णांना फिजिओथेरपी देण्यात आली. २१ रुग्णाची एमआरआय, १३ सीडी आणि एचआर सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी रुग्णांना मोफत औषधीही उपलब्ध करून देण्यात आली.

 पोद्दार हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजित देशमुख, डॉ. सुबोध सोमाणी ,  डॉ. चेतन सारडा, डॉ. संजय शिवपुजे, डॉ. गिरीश मैंदरकर, डॉ. सुरेखा काळे,  डॉ. सुरेश भट्टड, डॉ. हंसराज बाहेती,  डॉ. हणमंत किनीकर , डॉ. दीपक गुगळे,  दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले , प्रसाद उदगीरकर, जब्बार पठाण यासह वैद्यकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. अशोक पोद्दार यांना  शुभेच्छा दिल्या. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]