39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeक्रीडा*पोर्तुगाल येथील जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत नांदेडच्या भाग्यश्री जाधवने मारली बाजी*

*पोर्तुगाल येथील जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत नांदेडच्या भाग्यश्री जाधवने मारली बाजी*

रौप्य पदकावर कोरले भारताचे नाव
नांदेड-दि.येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, महाराष्ट्राची शान भाग्यश्री माधवराव जाधव हिने पोर्तुगाल येथे दि.28 नोव्हेंबर रोजी झालेल्या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत गोळा फेक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदकावर भारताचे नाव कोरले आहे.

मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री जाधव 2017 मध्ये पुणे येथे झालेल्या महापौर चषक स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली होती. 2018 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. पंचकुला येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते.

2019 मध्ये चीन येथे झालेल्या पॅरा ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग्यश्रीने कांस्यपदक पटकावले होते. 2020 मध्ये बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ती नंबर वन ठरली होती.2021 मध्ये दुबई येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने रौप्य व कांस्यपदकावर भारताचे नाव कोरले होते. 2022 मध्ये बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती.
2021 मध्ये जपान येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्रातील ती एकमेव महिला खेळाडू होती.या स्पर्धेत तिने जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.पोर्तुगाल येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या आयवॉज 2022 या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली होती या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्रातील ती एकमेव खेळाडू होती.या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत गोळा फेक या क्रीडा प्रकारात तिने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवून रौप्य पदकावर भारताचे नाव कोरले आहे.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री जाधवने जिद्द व प्रचंड मेहनतीच्या बळावर अवघ्या पाच वर्षांमध्ये दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सतत वर्चस्व राखत देशाबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक केला आहे.संघर्षमय जीवन जगत भाग्यश्री जाधवने क्रीडा क्षेत्रात मिळविलेले यश वाखाण्याजोगे आहे.
क्रीडा विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करीत असताना तिनेशिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही एम. ए . बी. एड्. ही पदवी संपादन करून सध्या ती कंधार येथील श्री शिवाजी विधी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.मला वेळोवेळी मदत करणाऱ्या सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक, उपचार करणारे डॉक्टर, माझे मार्गदर्शक यांच्या सहकार्यामुळेच मी हे यश संपादन करू शकले. माझे पॅरा ऑलिंम्पिक, एशियन स्पर्धेत सहभागी होऊन वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया भाग्यश्री जाधव हिने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]