लातूर-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य विभागा तर्फे दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घादगिने यांना 2022-23 चा पुरस्कार मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार , कॅबिनेट मंत्री श्री.संजय बनसोडे , श्री.सुमंत भांगे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , श्री.ओमप्रकाश बकोरिया आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य,श्रीमती वंदना कोचुरे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कोकण विभाग ,यांच्या उपस्थिीतीत प्रदान करण्यात आला.

प्रकाश घादगिने यांना यापुर्वी अनेक मोठया संस्थेचे पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये महाराष्ट्र समता सेवाभावी संस्थेचा समाज भुषण पुरस्कार,बहुजन विचार मंच परभणी यांचा मराठवाडा गौरव पुरस्कार,ऑल इंडिया शास्त्री फोरमचा सेवा रत्न गौरव पुरस्कार,सिरॉक इंडिया सामाजिक संस्था ठाणे यांचा मराठवाडा सेवाभावी पुरस्कार,स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचा मराठवाडा गौरव पुरस्कार,मराठी वृतपत्र संघ मुंबई चा समाजरत्न पुरस्कार,सदभावना मित्र मंडळाचा समाज सेवक पुरस्कार,युवा समुह वर्धा चा मानव भुषण पुरस्कार,जयहिंद सेवाभावी संस्था परभणीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार,महात्मा कबीर संस्थेचा लातूर रत्न पुरस्कार अशी अनेक पुरस्कारांनी त्यांना अनेक संस्थांनी त्यांना यापुर्वी गौरवले आहे.

त्याच्या सामाजिक कार्याची ,साहित्याची, संगीताची , अंधश्रध्दा निर्मलन कार्याची ,ज्येष्ठ नागरिक संघाची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या कार्याची दखल घेवुन त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबददल समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला शुभेच्छा दिल्या.
तसेच चैतन्य हास्य मंडळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी,ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य, महाराष्ट्र अंधश्रध्दा निमुर्लन समितीतील सदस्य,पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.




