राजेश्वर निटुरे “प्रजापालक” नेतृत्व- ना. अमित देशमुख
उदगीर/प्रतिनिधी,उदगीर नगरिचे भुषण राजेश्वर निटुरे हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ते नेते असा त्यांचा प्रवास आहे. जनतेच्या विकासासाठी कायम झटनारे व संकट समयी धावुन येणारे निटुरे हे खरोखरच प्रजापालक आहेत, असे गौरवोद्गार ना. अमित देशमुख यांनी प्रजापालक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देशमुख हे उदगीर दौऱ्यावर आले असता राजेश्वर निटुरे यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या प्रजापालक या पुस्तकाचे प्रकाशन निटुरे यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, राजेश्वर निटुरे, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,विजय देशमुख,सचिन बंडापल्ले,तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, शहराध्यक्ष मंजुरखॉं पठाण, रामरावमामा बिरादार
नगरसेवक श्रीरंग कांबळे, राजकुमार भालेराव, अनिल मुदाळे, रेखाताई कानमंदे, विजय निटुरे, सुभाष धनुरे, मारोती पांडे, अविनाश हेरकर, पुस्तकाचे संपादक मंडळ उपस्थित होते. यावेळी बोलतांना ना देशमुख म्हणाले कॉंग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत घेवुन जात असताना राजेश्वर निटुरे यांनी पक्षाची उत्तम बांधणी केली असल्यामुळे उदगीरची जनता कायम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. पुस्तकाच्या शिर्षका प्रमाणे ते खरोखरच प्रजापालक आहेत. त्यांचे सामाजिक, धार्मिक काम उल्लेखनीय असुन त्यांचे कार्य आपणास सर्वज्ञात आहे. या छोटेखानी कार्यक्रमात वारकरी संप्रदाय, डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन, व्यापारी वर्गासह युवक कॉंग्रेस उदगीर व जळकोट तालुका कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकरी तसेच निटुरे परिवाराच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.











