*प्रदिपसिंह गंगणे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन*

0
277

अँड प्रदिपसिंह गंगणे यांच्या कार्यालयाचे ना संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
—————————————-
अँड प्रदिपसिंह गंगणे यांच्या गंजगोलाई परिसरातील कार्यालयाचे उद्घाटन ना संजय बनसोडे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठविधिज्ञ अण्णाराव पाटील, सदस्य महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,जेष्ठविधिज्ञ व्यकटराव बेंद्रे, लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र काळे,शिवशंकर बिडवे जगदंबा देवस्थान अध्यक्ष, जेष्ठ विधिज्ञ उदय गवारे, सामाजिक कार्यकर्ते जमील नाना,तुळशीदास गंगणे ,अँड सचिन बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती
उदघाटन प्रसंगी ना संजय बनसोडे यांनी असे मनोगत व्यक्त केले की, संविधान दिनाचे औचित्य साधत विधिज्ञ कार्यालय उदघाटनाच्या निमीत्ताने शुभेच्छा दिल्या, अँड गंगणे गेल्या २० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत,पूर्व भागातील गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देतील त्याच प्रमाणे ना बनसोडे पुढे असे म्हणाले की, लातूरच्या जिव्हाळ्याचा उजनीचे पाणी मिळविण्याचा प्रश्न कृष्णा -गोदावरी खोऱ्याच्या लवादातील तरतुदीतील कचाट्यातून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बैठक मा मुख्यमंत्री यांच्याकडे मी पाणी पुरवठामंत्री असल्याने मा पालकमंत्री यांना सोबत घेऊन लातूरचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो आहे
तसेच पर्यावरण संरक्षणा संदर्भात गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, अनेक देशात कोव्हिडंची तिसरी लाट येत असल्याने नागरिकांनी आवश्यक नियम बंधने पाळावीत असे आव्हान करून महाविकास आघाडी कोव्हिडचा प्रसार थोपविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले,अँड अण्णाराव पाटील, अँड बेद्रे, अँड राजेंद्र काळे यांच्या मागणीवरून जिल्हा न्यायालयाच्या समोरील जागेतील नवीन इमारत बांधकामासाठी लक्ष घालण्याचा शब्द दिला
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड आणाराव पाटील यांनी ज्युनियरशिप नकरता सुद्धा कष्टातून पक्षकाराचे इमाने इतबारे वकिली केल्यास यश मिळु शकते असे सांगितले तर जेष्ठ विधिज्ञ व्यकटराव बेंद्रे यांनी कोणताही व्यवसाय आत्मविश्वासाने व प्रामाणिकपणे केल्यावर यश प्राप्त होते भारताच्या संविधान रक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने वकील वर्गावर येते आणि लोकशाही मध्ये कायद्यांचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी वाचनपूर्वक वकिली व्यवसाय करावा आणि वकिली व्यवसाय नोबल व्यवसायात मोडतो तो या व्यवसायात आर्थिक स्थर्य प्राप्त होण्यास वेळ लागतो असे मनोगत व्यक्त केले. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,अँड राजेंद्र काळे,सामाजिक कार्यकर्ते जमील नाना यांनी वकील व्यवसायास व नवीन कार्यालय शुभारंभाच्या शुभेच्छा दिल्या तर भाई अँड उदय गवारे यांनी गंगणे कुटूंबीय शेकापच्या विचारसरणीतील असुन अँड प्रदिपसिंह गंगणे यांचे आजोबा स्व जनार्धन गंगणे, अँड बेद्रे यांचे वडील स्व भगवान बेद्रे व माझे वडील गंजगोलाई भागात कार्यरत होते त्याचा वारसा अँड गंगणे चालवतील असे मनोगत व्यक्त केली यावेळी विधिज्ञ,डॉ, प्राध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवराची व पूर्व भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड प्रदिपसिंह गंगणे यांनी केले तर आभार अँड रतिकांत गंगणे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नंदकिशोर गंगणे,अँड सुषमा प्रदिपसिंह गंगणे,श्रीकांत गंगणे, अँड सुहास बेद्रे,अँड अमितकुमार कोथिंबीरे,अँड दत्तात्रय बेद्रे, आशिष बेद्रे,शाम बेद्रे,अँड आकाश घोलप,प्रमोद गंगणे,आनंद पारसेवार, बालाजी अप्पा पिंपळे,ताहेरभाई सौदागर, जमालोद्दीन मणियार,विनायक थोरात,दिगंबर कांबळे, गणेश सौदागर,फिरोज तांबोळी आदींनी परिश्रम केले
सूत्रसंचालन अँड इरफान शेख, दीपक गंगणे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here