भारत स्वतंत्रता का अमृत महोत्सव 2021 मनोज सहादेव अकॅडमीमध्ये उत्सवारंभ व प्रभात फेरी
 भारत स्वतंत्रता का अमृत महोत्सव उत्सवाअंतर्गत श्री सद्गुरू वेदानंद महाराज एज्युकेशन सोसायटी चे मनोज सहदेव अकॅडमी मध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रभातफेरी काढली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री हुकूमचंदजी कलंत्री, संचालक श्री प्रवीण राठी, श्री विजय वर्मा, श्री गणेश भास्करे, कोषाध्यक्ष डॉक्टर दिनेश वर्मा, शाळेचे प्राचार्य श्री गिरीश सहदेव व सचिव अर्की. विजय गि.सहदेव यांनी हम होंगे कामयाब हर दिन हा संदेश देऊन प्रभात फेरी ची सुरुवात केली. शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जलोषा मध्ये भारत माता की जय, वंदे मातरम,  जय जवान जय किसान घोषणा दिल्या.


