खासदार व आमदारांसह निलंगेकर यांचा शोभायात्रेत सहभाग
लातूर/प्रतिनिधी:प्रभू श्रीरामचंद्र हे तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान व आराध्यदैवत आहेत.प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रभू रामा विषयी आदर व श्रद्धेची भावना आहे,असे मत आ.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
रामचंद्र प्रतिष्ठान व समस्त लातूरकरांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभाग नोंदवल्यानंतर आ.निलंगेकर बोलत होते.आ.निलंगेकर यांच्यासह खा.सुधाकरराव श्रंगारे, जिल्हाध्यक्ष आ.
रमेशअप्पा कराड,आ.अभिमन्यु पवार,जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे,शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे,शैलेश गोजमगुंडे,शैलेश लाहोटी,मनिष बंडेवार,महेश कौळखैरे,प्रेरणा होनराव, दिग्विजय काथवटे,परिवहन सभापती मंगेश बिराजदार,युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,
नगरसेविका भाग्यश्री कौळखेरे,ज्योती आवसकर,सुनिल मलवाड,गणेश गोमचाळे,गणेशगवारे,देवा साळुंके,आदींसह लोकप्रतिनिधी,प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व रामभक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

बालाजी मंदिरापासून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. गांधी चौक,हनुमान चौक, गंजगोलाई,सुभाष चौक या मार्गे निघालेल्या या शोभायात्रेचा राम गल्लीतील राम मंदिरात समारोप झाला.
अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराची प्रतिकृती हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते.ढोल-ताशांची पथके अग्रभागी होती.शहरातील हजारो रामभक्त आणि तरुण या शोभायात्रेत सहभागी झाले.मागील दोन वर्षात कोरोनामुळे रामनवमीचा उत्सव साजरा करता आला नव्हता.त्याप्रमाणेच अयोध्येत राम मंदिराची उभारणी सुरु झाल्यानंतर प्रथमच यंदाची रामनवमी साजरी झाली. त्यामुळे रामभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,खा.सुधाकरराव शृंगारे,आ.रमेशअप्पा कराड, आ.अभिमन्यु पवार हे प्रारंभी पासूनच शोभायात्रेत सहभागी झाले.
रामभक्तांच्यासमवेत या लोकप्रतिनिधींनीही ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत ढोल-ताशांच्या तालावर ठेकाही धरला.त्यामुळे रामभक्तांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळाले.





