39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिक*प्राचार्य भोगडे सरांचा प्रेरणादायी सत्कार सोहळा*

*प्राचार्य भोगडे सरांचा प्रेरणादायी सत्कार सोहळा*

*अर्धशतकाहून जास्त काळ इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे भोगडे सर यांचा ह्रद सत्कार*

लातूर,(प्रतिनिधी )- इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक व गेली 55 वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे प्राचार्य चंद्रशेखर  भोगडे सर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एका शानदार कार्यक्रमांमध्ये त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

    प्राचार्य चंद्रशेखर चनबसप्पा भोगडे यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अमृत महोत्सवी समितीच्या वतीने त्यांचा गुरुवारी श्याम मंगल कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.महास्वामीजी श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते भोगडे सरांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी भोगडे सरांनी लिहिलेल्या *शिंपल्यातील मोती* या आत्मकथन पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

    यावेळी बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज तसेच  औसा येथील नाथ संस्थांचे विश्वस्त तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर  , माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार शिवाजीराव पाटील  कव्हेकर ,सांगोला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

   प्रारंभी  भोगडे परिवाराच्या वतीने महास्वामीजी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची पाद्यपूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ह भ प गहिनीनाथ महाराज यांनी देखील प्राचार्य  भोगडे सरांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

      डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वाचनात भोगडे सरांच्या अध्यापन कार्याचे कौतुक केले .विद्या विनयेन शोभते या उक्तीप्रमाणे भोगडे सरांनी आपल्या हयातीमध्ये अध्यापनाचे काम करून शिक्षण क्षेत्रापुढे आदर्श निर्माण केला आहे. स्वतःला घडवत एक चांगली पिढी निर्माण करण्याचे काम  भोगडे सरांनी केले आहे , असे  गौरवोद्गार महास्वामीजींनी काढले.

    ह भ प गहिनीनाथ महाराज यावेळी बोलताना म्हणाले की ,जो समाजाला घडवतो त्याने स्वतः अगोदर घडण्याचे काम केले पाहिजे .नम्रता, चारित्र्य, आचरण या गोष्टी असल्याशिवाय स्वतःला घडवता येत नाही आणि त्याशिवाय समाज मोठा होऊ शकत नाही .लोकांनी आदर व्यक्त करावा असे  भोगडे सरांचे कार्य आहे .

  सत्कारास उत्तर देताना प्राचार्य चंद्रशेखर  भोगडे सर म्हणाले की, आपण किती वर्षे जगलो यापेक्षा कसे जगलो  , दुसऱ्यासाठी आपण काय करू शकलो किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते कोणत्या प्रकारे केलं याचे मूल्यमापन आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात करणे गरजेचे असते . जी व्यक्ती संवेदनशील असते ती जीवनात समाधानी असते. आपल्या वागण्यामुळे किंवा शब्दामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये आपण दुसऱ्याच्या प्रगतीचा यशाचा आलेख पाहून दुःखी होतो आपण आपल्याच प्रगतीचे सिंहावलोकन केले तर आपण कुठे होतो कुठे आलो कुठे जाणार याची दिशा मिळते.

यावेळी आमदार विक्रम काळे ,डॉ. सुनील गायकवाड ,शिवाजीराव पाटील कव्हेकर ,प्रबुद्धचंद्र झपके आदींनी आपल्या मनोगतात भोगडे सरांच्या अध्यापन कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]