प्रेरणा होनराव यांची मागणी

0
374

 

कोरोना बाधीतांच्या मृत्यूचा खरा आकडा जाहीर करा, फुले योजनेचा लाभ द्या

भाजयुमोच्या प्रेरणा होनराव यांची मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे मागणी

सरकारी आकडयात दिशाभूल, वास्तव वेगळे

लातूर, प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचा बळी घेतला असला तरी सरकारी दप्तरी त्याची नोंद अत्यल्प करण्यात आली आहे. आकड्यातील ही तफावत नागरीकांची दिशाभूल करणारी असून शासन-प्रशासनाने कोरोना काळात झालेल्या मृत्यूंची खरी आकडेवारी तत्काळ जाहीर करावी व बाधीतांना महात्मा ज्योतीबा फुले योजनेचा लाभ तत्काळ द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (दि.१८) निवेदनाद्वारे केली असून या लोकप्रश्नी लक्ष घालावे अशी विनंतीही त्यांनी आ. सभांजीराव पाटील निलंगेकराकडे केली आहे.

कोरोनाने जनजविन विस्कळीत केले होते. अनेकांना त्याचा संसर्ग झाला व त्यात बरेचजण मरण पावले. शासन-प्रशासनाने मरण पावलेल्यांची नोंद योग्य प्रकारे घेणे गरजेचे होते परंतु ती घेतली गेली नाही. त्यांनी घेतलेल्या नोंदी जाहीर केलेले आकडे व दवाखान्यात मरण पावलेल्या कोराना रुग्णांची संख्या यात प्रचंड तफावत दिसून येत आहे. खरी संख्या लपवली असून योग्य ती आकडेवारी जाहीर करावी असे निवेदनात म्हटले आहे.

कोरोना संसर्गाने सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल झाले. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. उपचाराला पैसा जमा करण्यासाठी व्याजी उसनवारी करावी लागली, मालमत्ता गहाण ठेवावी लागली, अनेकांना प्रसंगी स्वताची घरेदारे विकावी लागली. या घालमेल महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनाच्या माध्यमातून काही अंशीतरी कमी करता आली असती तथापि लातूर शहर व जिल्ह्यामध्ये गोर -गरीब करोना बाधीतांना या योजनेचे अर्थसाह्य मिळावे यासाठी जिल्हा सनियंत्रण समितीने कसलीही मदत केली नाही. नाईलाजापोटी नागरीकांना खासगी दवाखाने गाठावी लागली. या योजनेंतर्गत ज्या रुग्णालयांनी रुग्णांना उपचार दिले त्याची संख्याही बोटावर मोजन्याइतत आढळली असून १०० पैकी केवळ तीन रुग्णांनाच त्याचा लाभ मिळाल्याचे दिसून आले आहे. शासन-प्रशासनाच्या बेफिकीरीचा फटका सर्वसामान्यांना बसला असून त्याची भरपाई देणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या कोराना बाधीतांनी दवाखान्याचे बिल, रेशन कार्ड जमा करुन तक्रार दिली आहे त्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत तत्काळ मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू अशा, इशारा प्रेरणा यांनी निवेदनातून दिला आहे. यावर शासन-प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे,मनिष बंडेवार,मिना भोसले,देवा गडदे,मुन्ना हाश्मी,दिग्विजय काथवटे,गणेश गोमसाळे,प्रविण सावंत,शिरीष कुलकर्णी,सतिश ठाकुर,ज्योतीराम चिवडे,ज्ञानेश्वर चेवले,श्रीराम कुलकर्णी,किशोर जैन,हेमंत जाधव,गजेंद्र बोकण,नितीन अंधारे,रत्नमाला घोडके,आशा जोशी,संतोष तिवारी,शोभा कोंडेकर,प्रगती डोळसे,भाग्यश्री भोसले आदिंची उपस्थिती होती.

ज्या कोरोना बाधीत रुग्णांनी खासगी द‌वाखान्यात उपचार घेतले व ज्यांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळाला नाही अशांनी या योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे राशन कार्ड झेराॅक्सह तत्काळ अर्ज करावेत . काही अडचन भासत असेल तर आमच्याकडे अर्ज जमा करावेत.

प्रेरणा होनराव, प्रदेश सचिव भाजयुमो

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here