आर्ट ऑफ लिविंग व ओ व्ही बी आय ( Overseas Valunteer for Better India) च्या माध्यमातून फूड फॉरेस्ट निर्मिती– महादेव गोमारे
आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून मागील 2013 पासून लातूरमध्ये नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. सोबतच वातावरणातील बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व नैसर्गिक शेती करण्यात येत आहे. आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून 3 लक्ष वृक्ष लागवड लातूर जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. यावर्षी आजादी का अमृत महोत्सव निमित्त 75000 हजार झाडांची वृक्ष लागवड आर्ट ऑफ लिविंग व OVBI (Overseas Valunteer for Better India) करण्यात येत आहे. यामध्ये प्रमुख्याने सर्व पशुपक्ष्यांना व वन्यजीवेंना चारा फळे मिळतील अशा पद्धतीची व्यवस्था या जंगलामध्ये करण्यात येत आहे. या परिसरात वावरणाऱ्या सर्व प्राण्यांना या ठिकाणी हक्काचे घर आणि अन्न पाणी मिळणार आहे. हा परिसर पूर्णपणे जैवविविधतेने संपन्न असेल.

दिनांक 21 सप्टेंबर रोजी
औसा तालुक्यातील सेलू या गावी सेलू ग्रामस्थ व गणेश विद्यालय सेलू तथा जिल्हा परिषद प्रशाला तील विद्यार्थी 5000 वृक्ष लागवड केली. यामध्ये 100 पेक्षा अधिक दुर्मिळ जातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना जैवविविधता व वातावरणातील बदलाचे होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच तावरजा नदी खोऱ्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे 20 फळांची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी टॉवरचा खोऱ्यातील 100 गावातील गावातील शेतकऱ्यांची चर्चा झाली असून अनेक ठिकाणी फळबाग लागवड करण्यात आली आहे. मागील पाच वर्षात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात दोन लाख फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने वातावरणातील बदलाला सुसंगत अशी फळांची वृक्ष लागवड करण्यात आलेले आहेत.अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्ह्यामध्ये सिताफळाची लागवड केलेली आहे या नवीन जातीच्या सीताफळामुळे शेतकऱ्यांना एक एकर शेतीतून वर्षाकाठी दीड ते दोन लाख इतके उत्पन्न मिळणार आहे, तर पेरू बागेतून आज शेतकरी एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळवत आहेत. असे याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंग चे पर्यावरण संचालक श्री महादेव गोमारे यांनी सांगितले. याप्रसंगी
आर्ट ऑफ लिविंग परिवार लातूर चे शिवशंकर चापुले, रोहित सरवदे, बालाजी कदम विनायक खताळ बालाजी पांढरे गणेश विद्यालय सेलूचे मुख्याध्यापक श्री अनिल मंगळगिरे, सहशीक्षकश्री कदम बाळू नानासाहेब ,श्री सेलूकर विश्वास शिवाजीराव शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, जिल्हा परिषद प्रशाला श्री.मादळे डी.एस. (प्रा.प.)
श्री.जाधव आर.डी.(स.शि.)
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,सेलू
श्री.सूर्यवंशी आर.एन. मु.अ. शिक्षक व विद्यार्थी गावातील ग्रामस्थ बालाजी कदम उद्धव बंडगर शंकर माने भास्कर कदम श्याम बंडगर सुरेश कदम संतोष बंडगर अजित बंडगर राजाभाऊ भुजबळ सुखदेव भुजबळ रोहित कदम नितीन कुंभार अंगद बंडगर, दयानंद पवार राजकुमार बोकडे तुकाराम कदम तसेच गावचे सरपंच श्री सिदाजी कदम, उपसरपंच शिवाजी पाटील यांनी आपली उपस्थिती नोंदवून वृक्ष लागवड केली.




