22.8 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeकृषीबंद साखर कारखान्याचे पुर्नजीवन

बंद साखर कारखान्याचे पुर्नजीवन

लातूर जिल्हयाचा समतोल विकास साधण्यासाठीच 

बंद साखर कारखान्याचे पुर्नजीवन

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत टवेन्टिवन शुगर्सच्या मार्फत जय जवान जय किसान शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 

देखभाल दुरुस्ती कामाचा शुभारंभ 

  • कार्यक्षेत्रातील ऊस लागवडीस योग्य असलेला क्षेत्राचा अभ्यास करून कारखाना विस्तारा बाबत निर्णय 
  • शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य मोबदला देण्यासाठी विज, इथेनॉल आणि बायेागॅस निर्मितीचाही विचार
  • कारखान्यात कामगार, कर्मचारी भरती करतांना स्थानिक अनुभवीना प्राधान्य 

लातूर  प्रतिनिधी : दि. ३

 लातूर जिल्हयाचा समतोल विकास साधण्यासाठीच बंद असलेल्या साखर कारखान्याचे पुर्नजीवन करण्याचा निर्णय घेतला असून सात तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला जय जवान जय किसान साखर कारखान्याचा आवश्यकते नुसार विस्तार होईल शिवाय येथे विज, इथेनॉल, बायोगॅस निर्मीर्तीचे प्रकल्प होतील अशी ग्वाही, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

   चाकूर तालुक्यातील  नळेगाव येथे मागच्या अनेक वर्षापासून बंद असलेला जय जवान जय किसान  शेतकरी साखर कारखाना आता ट्वेंटीवन शुगरच्या वतीने चालविण्यात येणार आहे, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज  सायंकाळी शनिवार दि. २ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व जिल्हयातील प्रमुख जाणकार मंडळीच्या उपस्थितीत मशिनरी पूजन करून मेंटेनन्स कामाला सुरुवात केली.

  यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, उपसभापती मनोज पाटील, डी.एन.शेळके, चाकुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, एल.बी.आवाळे, व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, सर्जेराव मोरे, चेअरमन गणपत बाजुळगे, व्हाईस चेअरमन रवींद्र काळे जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, आदींसह कॉंग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविकासआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद नागरिक उपस्थित होते.

  यावेळी पालकमंत्री ना. अमित देशमुख म्हणाले की, जय जवान जय किसान हा साखर कारखाना जिल्ह्यातील दुसरा कारखाना आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे पाहत तरुण पिढी उभे राहिली. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी या कारखान्याचे आम्हाला अनेक किस्से सांगितले आहेत. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन या कारखाना उभारणीला प्रोत्साहन दिले होते. दूरदैवाने गेली अनेक वर्ष हा कारखाना बंद होता मांजरा परीवाराने हा कारखाना चालवावा म्हणून शेतकऱ्यांचा सातत्यांने आग्रह होत होता. जिल्हयाचा समतोल विकास साधण्यासाठी सात तालुक्याचा कार्यक्षेत्र असलेला जय जवान जय किसान साखर कारखाना टवेन्टिवन कारखाना पून्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तातडीने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करून येत्या दिवाळीत हा कारखाना सुरू केला जाईल. कार्यक्षेत्रातील ऊस लागवडीस योग्य असलेला क्षेत्राचा अभ्यास करून कारखाना विस्तारा बाबत निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य मोबदला देण्यासाठी विज, इथेनॉल आणि बायेागॅस निर्मितीचाही विचार होईल. कारखान्यात कामगार, कर्मचारी भरती करतांना स्थानिक अनुभवीना प्राधान्य दिले जाईल, आवश्यकतेनुसार कारखान्यात स्थानिक होतकरू तरूणाची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. 

 आज गुढीपाडवा असल्यामुळे निसर्ग नियमानूसार वृक्षाची पानगथ्‍ थांबून आता नवी पालवी फुटत आहे, याच धर्तीवर आता जय जवान कारखान्यालाही चांगले दिवस येणार हे निश्चीत आहे असे नमूद करून जिल्यातील दूरदृष्टीचे नेते माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सदैव प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही या कार्यकमा दरम्यान दिली.

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी 

जिल्हा बॅक कायम तत्पर

  यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करून येणाऱ्या काळात शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी सर्वेतोपरी मदत केली जाईल. मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे येथे सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून त्यावेळच्या नेत्यांनी अनेक प्रकल्प बांधले त्यावर साखर कारखानदारी उभारली त्यातील काही कारखाने उत्तमरीतीने चालत आहेत. तर काही कारखाने दुदैवाने बद पडले आहेत. यात मांजरा परिवाराचे देशभरात कौतूक होत आहेत. या परीवराने यावर्षीच्या गळीत हंगामात आतापर्यंत ४४ लाख मेटन ऊसाचे गाळप करून १ हजार कोटी मोबदला अदा केला आहे. या पार्श्वभुमीवर बंद असलेले साखर कारखाने सुरू करून जिल्हयाचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख प्रयत्न करीत आहेत. आमदार धिरज देशमुख यांनी दिली.

  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, तसेच डी.एन शेळके, चाकुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, एन.बी आवाळे यांनी जय जवान कारखाना जय कीसान साखर कारखान्याची उभारणी व वाटचाल संदर्भात माहिती दिली.   यावेळी प्रास्ताविक टवेन्टिवन शुगरचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले. 

  प्रारंभी मधुकर माने, सौ सुरेखा माने, गोविंद शिंदे, सौ. जनाबाई शिंदे या शेतकरी दांपत्याच्या हस्ते सायंकाळी महापूजा करण्यात आली. तसेच ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते नळेगाव येथील जय जवान जय किसान शेतकरी सहकारी साखर कारखाना देखभाल व दुरुस्ती कामाचा श्रीगणेशा तसेच मशनरी पूजन करण्यात आले. 

  यावेळी सचिन दाताळ, बाबासाहेब गायकवाड, पृथ्वीराज शिरसाठ, स्वयंप्रभा पाटील, मारुती पांडे, निलेश देशमुख, अनिल चव्हाण, रामराव बुद्रे, नळेगावचे सरपंच ताजुद्दीन घोरवाडे, उपसरपंच शिरुरे, कारखान्याचे संचालक युवराज जाधव, आनंद बारबोले, कैलास पाटील, सुभाष माने, भारत आदमाने, ज्ञानेाबा पडीले, अनिल पाटील, गोविंद बोराडे,   

———————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]