*लाल बहादुर शास्त्री विद्यालयात बरसल्या नवोदितांच्या काव्यधारा …!*
(उदगीर) येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात *भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या स्वलिखित कवितांचे संमेलन* आयोजित करण्यात आले होते.यात एकूण 15 नवोदित कवींनी सहभाग नोंदवला होता. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन देखील विद्यालयाच्या नववी (अ) वर्गातील विद्यार्थ्यांनीच केले होते.
या संमेलनात प्रामुख्याने कु.राजनंदिनी आचोले हिने-कोरोना या विषयावर *”आलास कसा कोरोना बेभानात जीव गेला माणसांचा काही क्षणात”*
तर चि.शिवकांत पाटील याने मोबाईल व ऑनलाइन शिक्षण या विषयावर आपली
*”मोबाईल घेऊन आईवडिलांनी दाखवली वेडी माया,परंतु चॅटिंग करत लेकरं गेली पार वाया”* हि कविता सादर केली.
खाद्यपदार्थांची संस्कृती या विषयावर सादरीकरण करताना चि.श्रीनिवास वाडकर याने म्हटले की-
*”लग्नावळीत जेवण्याची असते निराळी धुंदी,आग्रह पूर्वक वराडींना वाढतात पिवळी बुंदी”*
अशाच प्रकारे कु.सानिका उदबाळे हिने- *”प्रणाम आराध्यदेवतेला”* कु.अंबिका ढोबळे हिने- *”अंधाराला भ्यायचं नसतं”* ,चि.ऋषिप्रसाद कनाडे याने – *”पाऊस”* कु.स्नेहा पवार,कु.तनुश्री बिरादार व कु.पल्लवी केंद्रे यांनी *”आई”* या विषयावर ,कु.कस्तुरी घनपाटी हिने- *”स्वप्नातली परी”*,चि. ज्ञानेश्वर बिरादार याने- *”छत्रपती शिवाजी”*,कु.सुजाता डब्बे हिने – *”भारतीय स्वातंत्र्यलढा”* ,कु.सायली सावळे हिने- *”वो दिन बीत जाते है”* तर कु.प्राची केंद्रे हिने- *”उनाड पोरं”* या विषयावर आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कु.श्रेया पुल्लागोर तर प्रमुख अतिथी म्हणून कु.प्रज्योत चिखले या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन- चि.वैभव एकंबेकर व कु.यशदा मनाठकर,स्वागत व परिचय-कु.शेजल स्वामी,प्रास्ताविक-कु. स्नेहल केंद्रे,वैयक्तिक गीत-कु.वैष्णवी सूर्यवंशी हिने सादर केले.तर आभार चि.गणेश रेड्डी याने मानले.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन विद्यालयाच्या तज्ञ शिक्षिका तथा अभ्यासपूरक मंडळ प्रमुख अनिता यलमटे व संस्कृत विषयाचे तज्ञ शिक्षक के.जा.नेमट यांचे लाभले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आठवी ते दहावी विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



