27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीयबसपाचे पुण्यात प्रशिक्षण शिबीर

बसपाचे पुण्यात प्रशिक्षण शिबीर


……
बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
….
पुण्यात बसपाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
राज्यभरातील हजारो कॅडर उपस्थित राहणार

मुंबई, ७ एप्रिल

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त व बहुजन समाज पार्टीच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे कॅम्प येथील ‘आझम कॅम्पस’ सभागृहात पक्षाचे दोन दिवसीय ‘राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. ९ आणि १० एप्रिल ला आयोजित या शिबिरातून पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मा.खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ साहेब,  महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.नितीनसिंहजी जाटव साहेब, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.प्रमोदजी रैना साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष मा. अँड.संदीप ताजने साहेब राज्यभरातील ‘कॅडर’ला संबोधित करतील. विविध सत्रांदरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत शिबिरात पक्ष विचारसरणी,  संघटन बांधणी तसेच राजकारण आणि समाजकारणाच्या अनुषंगाने प्रमुख नेते कॅडरला मार्गदर्शन करणार आहेत.



कोरोना महारोगराईनंतर पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरावर एवढ्या भव्य स्वरूपात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही काळात पक्षाने जिल्हानिहाय संघटनबांधणी तसेच कॅडर निर्मितीवर विशेष भर दिला आहे.वचनबद्ध तसेच शिस्तबद्ध कॅडरच बसपाची शक्ती आहे. अशात सामाजिक परिवर्तनासाठी कॅडरचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’च्या अनुषंगाने कॅडरला मार्गक्रम करण्यासाठी हे शिबिर महत्वाचे ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेबांनी गुरुवारी व्यक्त केला.

शिबिरात मा.प्रशांत इंगळे (प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश) , मा.सुनील डोंगरे (प्रभारी,महाराष्ट्र प्रदेश), मा.चेतन पवार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश), मा.सुदीपजी गायकवाड (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश), मा.भाऊसाहेब शिंदे (सचिव,महाराष्ट्र प्रदेश), मा.अजित ठोकळे (सचिव,महाराष्ट्र प्रदेश), मा.सुरेशदादा गायकवाड (सचिव, महाराष्ट्र प्रदेश) यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युनिटचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित राहतील अशी माहिती बसपाने निवेदनातून दिली आहे.
………………………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]