*राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायत राज संस्था
गुहाटी येथे बांबू कार्यशाळा संपन्न*
==========
*पाशा* *पटेल* *यांच्या* *अध्यक्षतेखाली* *कार्यशाळा* *संपन्न*
===========
*नेतृत्व करण्याचे पाशा पटेल यांना साकडे*
आसाम मध्ये मोठ्या प्रमाणात बांबू असले तरी ते जंगली स्वरूपातील आहेत. कोणत्या जातीचे बांबू आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणारे आणि गृहसजावटीच्या वस्तूसाठी उपयोगी आहेत, शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करावी, याची माहिती ईशान्य भागातील जनतेला नाही. त्यामुळे बांबू या क्षेत्रात पाशा पटेल यांनी आमचे नेतृत्व करावे असे साकडे या कार्यशाळेला उपस्थित बांबू प्रेमी आणि बांबूपासून वस्तू निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घातले असता, पाशा पटेल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राप्रमाणेच ईशान्य राज्यातही चळवळीला अधिक गती देऊन
राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थानच्या माध्यमातून या भागात प्रशिक्षण देऊन बांबूप्रेमी जनतेचे संघटन वाढवून बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या मार्केटिंगसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू आणि प्रशिक्षण देऊ, अशी ग्वाही यांनी दिली.

*गुवाहटी/आसाम* – आसामसह ईशान्य भारतात बांबू हा ब्लर मध्येच आहे. बांबूचे महत्व काळाच्या ओघात या भागातील लोक विसरत गेले आहेत. बांबूचे सामाजिक, पर्यावरणविषयक व आर्थिक महत्त्व लोकांना माहीतच नाही. या भागात बांबू मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बांबू हे जंगली पीकच राहिले आहे. त्यामुळे उच्च प्रतीचा बांबू मिळत नाही, हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. अनेक ठिकाणी तर बांबू तोडून रबर झाडाची लागवड करण्यात आलेली आहे. या भागात जंगल मोठे आहे. मात्र, त्यात झाडे नाहीत. अशा परिस्थितीत बांबूची शास्त्रीय पद्धतीने लागवड करणे महत्वाचे झाले असून, शालेय अभ्यासक्रमातच बांबू शेती, त्याचे महत्व विशद करून प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायतराज संस्थानचे सदस्य तथा देशभर बांबू लागवड चळवळ उभारणारे पाशा पटेल यांनी केले. बांबू लागवडीसाठी या क्षेत्रातील प्रेमिंचे संघटन वाढवून मार्केटिंगसाठी संस्थांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायतराज संस्थान अर्थात एन आर डीएचे ईशान्य प्रादेशिक केंद्र गुवाहाटी येथे रविवार ता. 19 रोजी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बांबू या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महत्त्वाच्या प्रतिनिधींची एकदिवशीय कार्यशाळा पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थांनचे संचालक डॉ. गवळी, प्रा. सुरेश नागपूर, विजयकुमार, अनुराग चहलिया या व इतर अधिकाऱ्यांसह बांबू पुरवठादार अटल बोहरा, बांबूचे व्यापारी व बांबूपासून गृहउपयोगी वस्तू बनवणारे परीक्षित, बांबूच्या वस्तू परदेशात निर्यात करणारे उत्पल शर्मा, या क्षेत्रात काम करणारे राष्ट्रपती पदक विजेते महिंद्र डेका तसेच बांबूपासून टी-शर्ट आणि कपडे बनवणारे व्यवसायिक मेघाली दास, पाशा पटेल यांचे सहकारी संजय करपे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गवळी यांनी पाशा पटेल यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायत राज संस्थांनमधील त्यांच्या योगदानाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
अध्यक्ष भाषणात पाशा पटेल यांनी उपस्थित बांबू या क्षेत्रातील प्रतिनिधींना बांबूची शास्त्रीय लागवड, बांबूचे पर्यावरण विषयक महत्व, बांबूपासून तयार करता येणाऱ्या वस्तू, मार्केटिंग आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आसाममधील गावागावात बांबूपासून वस्तू तयार करणारे कारागीर आहेत. मात्र, प्रक्रिया केलेले बांबू त्यांना मिळत नाहीत. असे बांबू न मिळाल्यास वाहतूक खर्च आणि टोल नाक्यातच त्यांची किंमत संपून जाण्याची भीती हे कारागीर व्यक्त करू लागले आहेत. तुम्ही आमचे नेतृत्व करा, असे ते वारंवार सांगत आहेत. आपणास वाटायचे की, आसाम बांबू या क्षेत्रात पूर्ण देशाचे नेतृत्व करेल. मात्र, इथे आल्यानंतर लक्षात आले की, आपण बांबूचा जो अभ्यास केला, तो येथील लोकांना माहीतच नाही. महाराष्ट्रात जशी बांबू चळवळ उभारतोय, तसेच आसाम, नागालँड आदी ईशान्य भागातील सात राज्यात उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आसामपेक्षा जास्त बांबू आहे. मात्र, ते जंगली असून, ते काढून शास्त्रीय पद्धतीने लागवड करणे काळाची गरज बनली आहे. ते आव्हान येथील जनतेने स्वीकारले नाही म्हणून बांबूप्रेमी लोकांचे संघटन वाढविण्याचे काम आपण राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थांनच्या माध्यमातून करणार असल्याचे पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले.
येथे घरात, शेतात बांबू आहेत. मात्र, त्याचे ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर इथेनॉल, दगडी कोळसा, प्लास्टिकसह प्रदूषण वाढणाऱ्या इंधनाला पर्याय म्हणून बांबूचे महत्व येथील लोकांना कळलेच नाही. त्यामुळे बांबू प्रेमी जनतेचे प्रबोधन केले तर मोठ्या प्रमाणात बांबू लागवड होऊ शकते. बांबू लागवडीसाठी खड्डे करण्याची गरज नाही. त्याशिवाय बांबू लागवड करता येते, त्यादृष्टीने आपण ईशान्य राज्यात जनजागृतीवर अधिक भर देणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राज्यात फक्त एकच टिशू कल्चर प्रयोगशाळा आहे. जिल्ह्याजिल्ह्यात अशा प्रयोगशाळा उभारून प्रशिक्षणाची












