लातूर : बापू – सुधा काळदाते प्रतिष्ठानच्यावतीने गुरुवार दि. १ डिसेंबर २०२२ रोजी ज्येष्ठ शिक्षण, अर्थतज्ञ व माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या व्याख्यानाचे आयोचजण करण्यात आले आहे. लातूर विधानसभा निवडणुकीत १९६७ साली ऐतिहासिक विजय मिळवून सुरू केलेल्या आपल्या राजकीय कारकीर्द सुरू केलेले डॉ. बापूसाहेब काळदाते यांचा कायम लातूरशी नाळ जोडलेली होती. डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या जन्मदिनी दि. १ डिसेंबर रोजी व्याख्यान आयोजित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

या बैठकीत ‘नोट बंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यान दि. १डिसेंबर २२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पूर्णानंद मंगल कार्यालयात आयोजित करण्याचे ठरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड. धनंजय पाटील हे राहणार आहेत. व्याख्यानाच्या नियोजनाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस संयोजन समितीचे अशोक गोविंदपूरकर, शिवाजीराव शिंदे, ॲड. मोहनराव पाटील, ॲड. वसंत उगले, अरविंद कांबळे, प्रा. सुधीर देशमुख, प्रा. सुधीर अनवले, कॉ. विश्वंभरराव भोसले, ॲड. आर. के. चव्हाण, प्रा. दत्ता मुंडे, प्रतिष्ठानचे सचिव ॲड. सुनील काळदाते, रणजित खंदारे आदी उपस्थित होते. व्याख्यानाच्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.