22.8 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeसामाजिकबाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीचे भाजपकडून स्वागत

बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीचे भाजपकडून स्वागत

बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीचे भाजपकडून स्वागत गोलाईतील व्यासपीठाने वेधले लातूरकरांचे लक्ष

लातूर/प्रतिनिधी : लहानापासून थोरापर्यंतच्या उत्साहाला उधाण आणाºया सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीने झालेली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणूकीचे लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने स्वागत करून गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांचा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी सत्कार केला.

गोलाई परिसरात उभारण्यात आलेल्या शहर भाजपाच्या स्वागत व्यासपीठाने लातूरकरांसह गणेश भक्तांचेही लक्ष वेधून घेतले होते.राज्यभरात संपन्न झालेला सार्वजनिक गणेश उत्सवात लहानापासून थोरापर्यंतच्या उत्साहाला उधाण आले होते. उत्सवातील दहा दिवसांच्या काळात लातूर शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण व बाप्पाचा गजर ऐकण्यास येत होता. शनिवार दि. ६ सप्टेंबर सार्वजनिक गणेश उत्सवाची सांगता विसर्जन मिरवणूकीने झाली. लातूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून या विसर्जन मिरवणूकीसाठी वेगवेगळ्या देखाव्यासह पारंपारिक वाद्यांचा गजर करणाºया कलावंतांचा समावेश करण्यात आला होता.

गणेश मंडळाचे पदाधिकारी व गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप देण्यासाठी लातूर शहर भाजपाच्या वतीने गोलाई परिसरात स्वागत व्यासपीठ उभारण्यात आले होते. या व्यासपीठाने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.विसर्जन मिरवणूकीत मानाचा पहिला गणपती भारतरत्न आझाद गणेश मंडळा गोलाई परिसरात आल्यानंतर या मंडळाच्या अध्यक्षांसह पदाधिकाºयांचे स्वागत भाजपकडून करण्यात आले. यानंतर बाप्पाची आरती करून या लाडक्या गणपतीला वाद्याच्या गजरात निरोप देण्यात आला.

या नंतर सुरु झालेल्या विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या प्रत्येक गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या हस्ते शाल, श्रीगणेशाची प्रतिमा व सन्मानचिन्ह देवून करण्यात आला. या व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, देविदास काळे, माजी स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, महिला मोर्चा अध्यक्षा रागिणी यादव, सरचिटणीस अ‍ॅड. दिग्वीजय काथवटे, रवि सुडे, मंडलाध्यक्ष विशाल हवा पाटील, राहूल भुतडा, सुरेश जाधव, सचिन सुरवसे,अ‍ॅड. ललित तोष्णीवाल, मधुसुदन पारीख,शिवसिंह सिसोदीया, स्वागत व्यासपीठ संयोजक किशन बडगिरे, प्रमोद गुडे, विनय जाकते, प्रविण कस्तुरे, विजय अवचारे, अजय भुमकर, अ‍ॅड. किशोर शिंदे, मुन्ना हाश्मी, बाबा गायकवाड, संजय गीर, रोहिणी देशमुख, सीमा करपे, ज्योती रसाळ, शोभा कोंडेकर, आफरीन खान, व्यंकटेश कुलकर्णी, किशोर जैन, अतिष कांबळे, संजय सुरवसे, नागोराव बोरगावकर, आकाश जाधव, राजकुमार गोजमगुंडे, संजय सुरवसे, गणेश गोजमगुंडे, जमिल शेख, अभिजीत मदने, सागर घोडके, सचिन मदने, गणेश कसबे,मोहम्मद शेख, महादेव कांगुले आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेले गणेश मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्तांवर फुलांची उधळण करत उत्साही वातावरण अधिक खुलविण्यास शहर जिल्हा भाजपाने मोठा हातभार लावला होता.पोलिस प्रशासनाचाही केला सत्कारश्री विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवून चोख भूमिका पार पाडली. विसर्जन मिरवणूकीदरम्यान पोलिस प्रशासनाने प्रत्येक गणेश मंडळांसह राजकीय पदाधिकाºयांची सुसंवाद साधून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडली. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर शहर भाजपाच्या वतीने पोलिस अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]