बारामती—शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर या शासनमान्य संघटनेच्या शाखा उघडण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीमती सरोजिनी कौत्तिक्कर,सचिव श्रीमती कांचन कोळेकर व खजिनदार श्री सचिन शितोळे, उपाध्यक्ष स्वाती धुलगुंडे,लता मंगुळकर, प्रविण काशिद यांची तर कार्याध्यक्ष निर्मला लाळगे , नंदिनी दडस, संघटक उज्वला जाधव नितीन इंगळे यांच्या सह सहसचिव चारुशिला भिसे,धिरज धनवजीर,प्रगती देशमुख,सहखजिनदार – स्वाती पाटील,आकाश खंदारे,शितल कसबे,सदस्य आरती थोरात सिल्वान रजपूत,किर्ती खराडे, संगिता आटोळे,डेबोरा कसबे, साक्षी कदम,स्वाती ठोसर, वैशाली शिंदे,मीना ठोंबरे,वंदना पंडीत इत्यादींची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड झालेली कार्यकारिणी राज्याध्यक्ष डॉ मनिषा शिंदे व
राज्यसरचिटणीस सुमित्रा तोटे यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली. कार्यक्रमास रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री कोकरे हे ही उपस्थित होते व उपस्थितांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या . यावेळी राज्यकार्यकारिणीच्या वतीने कार्यकारिणीस मान्यता व संलग्नता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच राज्यसरचिटणीस यांनी उपस्थितांना संघटनेच्या कार्यपद्धती ध्येय उद्दिष्टे याबाबत मार्गदर्शन केले,तर डॉ.मनिषा शिंदे यांनी संघटना परिचारीकांच्या कल्याणार्थ कार्यरत राहील, परिचारीकांचे व्यावसायिक,वैयक्तिक, सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत राहील असे सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, श्रीमती सरोजिनी कौतिक्कर यांनी केले तर आभार डेबोरा कसबे यांनी मानले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी,सचिव कांचन कोळेकर प्रविण काशिद, नंदिनी दडस सदस्य संगिता मुंगल, सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य इत्यादींनी प्रयत्न केले.
