*बिबट्या आलाय पळारे पळा…*

0
381

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील वनविभागातील जंगलात बिबट्या असल्याच्या अफवेने नागरिकांत धास्ती वाढली..!

केळगाव आणि परिसरातील गांवकरी भयभीत वनविभागाने शोध घेणे आवश्यक..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील केळगाव येथे वनविभागाचे जंगल असून,तेथे गुरूवारी सकाळी एकाला बिबट्याचे दर्शन झाले आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान,वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडून बिबटयाच्या काही पाऊलखुणा आढळून येतात का,याचा शोध घेणे सुरू आहे.


निलंगा तालुक्यातील केळगाव-लांबोटा येथे वनविभागाचे जंगल आहे.गुरूवारी सकाळी या परिसरात असलेल्या रामलिंगेश्वर देवस्थानचे पुजारी महाराज बाबा यांना बिबटया दिसला.त्यांनी ही माहिती पंचायत समिती सदस्य महेश देशमुख व गांवकर्‍यांना दिली.त्यानंतर महेश देशमुख यांनी तहसीदारांना ही माहिती सांगितली.त्यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचार्‍यांना पाठविण्यात येईल,असे सांगितले.बिबट्याचे दर्शन झाल्याने गाव व परिसरातील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.शेतात कामानिमित्त गेलेले शेतकरी गावाकडे परतले होते.
एकंदर,वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन आवश्यक असल्याचे केळगाव गांवकरी आणि परिसरातील गांवकरी करीत आहेत.माञ,बिबट्याचा शोध घेण्यासाठी आले आणि हाते हालवित गेल्याची खमंग चर्चा नागरिकांत होती.त्यामुळे वनविभागातील कर्मचार्‍यांनी तात्काळ बिबट्याचा शोध घेऊन केळगाव गावातील आणि परिसरातील या भागात शेती आहे तरी त्यांना शेतीविषयक कामकाज करण्यासाठी आवक-जावक करावे लागते त्यामुळे वनविभागाने मोकळा श्वास घेणार्‍या बिबट्याला पकडणे आवश्यक असल्याची मागणी करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here