बँक कर्मचारी चळवळीत सांस्कृतिक आशय निर्मिती बाळकृष्ण धायगुडे यांनी केली- कॉ़ धनंजय कुलकर्णी
लातूर : प्रतिनिधी
मोर्चे, घोषणा, सभा, भाषणे या चौकटीच्या बाहेर जाऊन बँक कर्मचारी चळवळीत बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक आशय निर्माण करुन ही चळवळ त्यांनी लोकाभिमुख केली़ नाटक, पथनाट्य या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे, असे गौरवोद्गार बँक कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय नेते कॉ़ धनंजय कुलकर्णी यांनी काढले़
स्टेट बँक आॅफ इंडियाची प्रदीर्घ सेवा बजावून बाळकृृष्ण धायगुडे सेवानिवृत्त झाले़ त्यानिमित्ताने बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कॉ़ कुलकर्णी अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते़ यावेळी शाखाधिकारी अरविंद वाघमारे, प्रफु ल्ल वाघमारे, बँक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे नेते राजेंद्र दरेकर, आऱ बी़ इबुतवार, अंजली स्वामी, उमेश कामशेट्टी, प्रशांत धामणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़
३५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप उमटवली असुन त्याबद्दल अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत़ पुरोगामी विचारांचे बाळकृष्ण धायगुडे हे अष्टपैलु व्यक्तीमत्व असुन बहारदार सुत्रसंचालन ही त्यांची ख्याती आहे़ सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमात बँकेच्या वतीने भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला़ अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांना शुभेच्छा देत अगामी काळात त्यांच्याकडून नाट्यक्षेत्राविषयी खुप मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या़
कार्यक्रमास अॅड़ उदय गवारे, प्रा़ सुधीर अनवले, प्रा़ डॉ़ शिवाजी जवळगेकर, कॉ़ उत्तम होळीकर, दीपक माने, उदय मोरे, प्रदीप भोकरे, रवि आघाव, निर्भय कोरे, दिलीप सोरडगे, नागसेन कामेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक शााखाधिकारी अरविंद वाघमारे यांनी केले़ सुत्रसंचालन अर्चना कसबे तर हेमंत हिरे यांनी आभार मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी लांडगे, कविता सरातीया, विनय पााटील, वर्षा कोकाटे, खंडू बागल, महालिंग स्वामी, पुष्पा गरड यांनी सहकार्य केले़