औसा प्रतिनिधी
शहरात शिकणारे विद्यार्थीच हुशार असतात असे नाही ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थी सुद्धा हुशार असतात .भविष्यामध्ये ते इंजिनियर डॉक्टर बनतील पण जिल्हा अधिकारी सुद्धा बनतील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेची दिवसेंदिवस गुणवत्ता वाढत आहेत याचं कारण की शालेय व्यवस्थापन व शिक्षकांचा समन्वय असल्यामुळे व पालकांचे लक्ष असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस आले आहेत .
बेलकुंड जिल्हा परिषद शाळेमध्ये शुद्धलेखनचे क्लास होतात .शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये 32 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले प्रत्येक विद्यार्थ्याला चार वर्षात 48 हजार रुपये मिळाले आहेत. बेलकुंडची जिल्हा परिषद शाळा औसा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची शाळा चालत आहे. जिल्हा परिषद शाळा असून सुद्धा 96 टक्के घेऊन चार विद्यार्थी गुणवंत यादी मध्ये आले आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर बनू शकतो पण जिल्हाधिकारी सुद्धा बनू शकतो. बेलकुंड च्या शाळेत दोनशे झाडे लावून त्याचे संगोपन केले आहे. एका रिटायर्ड शिक्षकाने शाळेला बोर पाडून दिले आहे. लोकवर्गणीतून शालेय व्यवस्थापन समितीने सर्व वर्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पहिली पासून दहावी पर्यंत विद्यार्थ्याला टीव्ही च्या स्क्रीन वर अभ्यास शिकविला जातो. जिल्ह्यामध्ये एकमेव जिल्हा परिषद शाळा अशी आहे की जिथे सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेचे तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारची शैक्षणिक शाळा म्हणून ओळखली जात आहे. असे प्रतिपादन संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले.
दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, प्रा.सुधीर पोतदार ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र , विलास नवले पोलीस सहाय्यक निरीक्षक भादा यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर यावर्षी प्रशालेमध्ये मी. असा. घडलो ही व्याख्यानमाला प्रत्येक महिन्याला एक सुरू करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प नवले याांच्य हाताने सुरुवात करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, ग्रामीण भागातून चांगले अधिकारी, आदर्श नागरिक घडावेत यासाठी ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे. याा कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्यााध्यापक किरण पाटील उपस्थित होते त्यावेळी उपसरपंच सचिन पवार शालेय व्यवस्थापन समितीचेे अध्यक्ष विलास तपासे उपाध्यक्ष माधुरी पाटील सदस्य सरोजा साळुंख पोलीस पाटील व्यंकट साळुंके तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख गोविंद वगरे खंडू उबाळे सम्राट युवा भीम सामाजिक संघटनेेेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे वंचित चे तालुका युवक अध्यक्ष अखिल शेख विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष हलकरे आनंद शिंदेे, राम कृष्ण निकतेे, रामकृष्ण माने, दत्ता हलकरेे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनेेे उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय दंडगुलेे यांनी केले तर आभार प्रदर्शन बिराजदार सर यांनी मांडले. त्यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत गाऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे हार पुष्प शाल घालून जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.




