हजारो युवक युवतीची उपस्थिती सात हजार बेरोजगारांची प्रत्यक्ष नोंद
निलंगा-(प्रशांत साळुंके)-
सुशिक्षित व गरजू तरुणांच्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार अनुप पाटील, पोलीस उपअधीक्षक दिनेश कोल्हे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडू सोळुंके, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव मंमाळे, वसंत पालवे, तास्मिया शेख आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्याला निलंगा मतदार संगातील ७ हजार बेरोजगार मुला मुलींची आॕनलाईन नोंद करण्यात असून त्यापैकी २१ बेरोजगारांना प्रत्यक्ष नौकरीची संधी या महामेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे.तसेच राहिलेल्या ५ हजार बेरोजगारांनाही येणाऱ्या भविष्य काळात अण्णासाहेब पाटील,महात्मा फुले या महामंडळाच्या माध्यमातून नौकरी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी दिली आहे.

निलंगा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) रोजगार, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या बहुआयामांवर आधारित हा मेळावा घेण्यात आला होता.पंडीत दिनदयाळ उपाध्याय सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याला निलंगा मतदार संघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ येथील युवक युवती मोठ्या प्रमाणात आले होते. यावेळी उपस्थित युवक युवतीना माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते काही जॉबकार्डचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण मेळाव्याच्या माध्यमातून २ हजार युवक युवतीना थेट रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून तसेच स्वयंरोजगार व व्यवसायासाठी इच्छुक तरुण-तरुणींना त्याविषयी मार्गदर्शन व आर्थिक मदतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ व महात्मा फुले आर्थिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली आहे.