सेवाकार्याच्या माध्यमातून सशक्त व निरोगी समाजनिर्मिती व्हावी – पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा भाजपच्या रक्तदान शिबिराला उत्सफुर्त प्रतिसाद
लातूर प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोषित व वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवा परमो धर्म या तत्वाचा अवलंब करत केंद्र सरकारच्या माध्यमातून कार्य केले आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा सुद्धा सेवा परमो धर्म हीच असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पंधरवाड्यात सेवा कार्याच्या माध्यमातून सशक्त व निरोगी समाजनिर्मिती व्हावी अशी अपेक्षा पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर यादरम्यान शहर जिल्हा भाजपच्या वतीने सेवा पंधरवाडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ गंजगोलाई परिसरात रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाने करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले बोलत होते.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका तथा प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव, अर्चना पाटील चाकूरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, सरचिटणीस मीना भोसले, अॅड.दिग्विजय काथवटे, शहर जिल्हा अभियान संयोजक अमोल गीते, सहसंयोजक संजय गिर, रविशंकर लवटे आदी उपस्थित होते. भाजपाने अंत्योदय विकास हाच विचार जोपासत आपले पक्षकार्य सातत्याने पुढे नेले असल्याचे सांगत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले कि, समाजातील प्रत्येक घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष लक्ष दिलेले आहे. प्रामुख्याने शोषित आणि वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष सुचना देऊन त्यादृष्टीनेच केंद्र व राज्य सरकारची वाटचाल सुरु ठेवण्यास सांगितले आहे. सेवा परमो धर्म या तत्वाचा अवलंब करत भाजपसह केंद्र व राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने आपले काम सुरु ठेवले असल्यामुळे आज अनेकांना विविध योजनांचा फायदा होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही विविध उपक्रम सुरु केले असून अनेक योजनाही अंमलात आणलेल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियान आयोजित केलेले असून या अभियानाच्या माध्यमातून लातूर शहर जिल्हा भाजपाने सशक्त व निरोगी समाज निर्मिती करण्यासाठी उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निस्वार्थपणे कार्य करत समाजातील प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून सशक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निस्वार्थी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शहर जिल्हा भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे आवाहन केले. सेवा पंधरवाडा अभियानाच्या माध्यमातून लातूरमध्ये प्रत्येक समाजाशी जोडले जाण्याची संधी आपल्या सर्वांना प्राप्त झालेली असून या संधीचे सोने करत आगामी महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सेवा पंधरवाड्यात विविध उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले.

रक्तदान शिबिराच्या उद्घाटनापुर्वी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जगदंबा देवीची महाआरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी व उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. या रक्तदान शिबिरात १२६ जणांनी रक्तदान करून आपला सेवा धर्म निभावला. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शिबिराचे संयोजक ओम धरणे, पवन आल्टे, निखील गायकवाड, गोविंद सुर्यवंशी यांच्यासह मंडल अध्यक्ष निर्मला कांबळे, सुरेश जाधव, राहुल भुतडा, विशाल हावा पाटील, रोहित पाटील, सचिन सुरवसे, महिला मोर्चा अध्यक्षा रागिणी यादव, माजी परिवहन सभापती मंगेश बिरादार, श्वेता लोंढे, स्वाती घोरपडे, शोभा पाटील, शितल मालू, देवानंद साळुंके, संगीत रंदाळे, गोरोबा गाडेकर, मधुसूदन पारीख, अॅड.ललित तोष्णीवाल, प्रमोद गुडे, बालाजी शेळके, धनंजय हाके, आबासाहेब चौगुले, शिवसिंह सिसोदिया, गणेश हेड्डा, विनय जाकते, अजय भुमकर, श्रीराम कुलकर्णी, धनंजय साठे, मुन्ना हाश्मी, अॅड.गणेश गोजमगुंडे, महेश झंवर, अॅड.विजय आवचारे, महादेव कानगुले, अभिजित मदने, संतोष पांचाळ, अॅड.किशोर शिंदे, बालाजी गाडेकर, अर्चना आल्टे, भरत भोसले, शिवाजी कामले, मंदार कुलकर्णी, भरत लोंढे, राजन सोनवणे, अतिश कांबळे, अॅड.पंकज देशपांडे, स्वराज यादव, वैभव वनारसे, राजेश पवार, सहदेव बिरादार, आकाश पिटले, किशोर कवडे, पवन आल्टे, गणेश खाडप, गौरव यादव, संतोष तिवारी, गजेंद्र बोकन, शैलेश भडीकर, बाबा गायकवाड, हेमा येळे, सीमा करपे, गणेश कसबे, अमजद पठाण, सचिन मदने, प्रीतम मुंडलिक, चैतन्य फिस्के, करण हाके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आज दाखवणार चित्रफीतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा भाजपच्या वतीने आज गुरुवार दि. १८ सप्टेंबर रोजी लातूर शहरातील पी.व्ही.आर. टॉकिज येथे पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखवण्यात येणार आहे. संध्याकाळी ०६:३० वाजता दाखवण्यात येणाऱ्या ही चित्रफित बघण्यासाठी शहर जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.




