पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्ष परिपूर्तीच्या
समर्थनात भाजयुमोतर्फे लातूरात “विकासतीर्थ बाईक रॅली”
विकासकामाचा आढावा ः बाईक रॅलीतून दिला केंद्राच्या योजनाचा संदेश
लातूर दि.15-06-2022
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्यकाल आठ वर्ष पूर्ण झाला असून या आठ वर्षामध्ये त्यांच्या संकल्पनेतून विविध विकास योजना राबविण्यात आल्या. यामध्ये किसान के्रडीट कार्ड, जलजीवन योजना, पिक विमा योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री किसान विकास योजना, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना या प्रमुख योजनेसह अनेक विकासकामे त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. या विकास संकल्पपूर्तीला आज तब्बल आठ वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे भाजयुमोचे प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील, माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील साई मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक विकासतीर्थ बाईक रॅली काढून लातूर शहरातील नागरिकांना व भाजयुमोच्या पदाधिकार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षातील विकासकार्याचा संदेश देण्यात आला. त्यांच्या या कार्याचा आदर्श इतर लोकप्रतिनिधीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

जागतिक पातळीवर भारताची नवी ओळख निर्माण करणारे तसेच देशातील प्रत्येक घटकाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षमनेतृत्वाखाली आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत. या आठ वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पी.एम.किसान योजना, प्रधान घरकुल आवास योजना, किसान के्रडीट कार्ड, जलजीवन योजना, पिक विमा योजना, जननी सुरक्षा योजना अशा अनेक योजना राबवून सर्वसामान्य नागरिकाला आधार देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. तसेच लातूरसाठी लातूर कोच फॅक्टरी, लातूर शहर व लातूर जिल्ह्यासाठी पंधरा हजार कोटीच्या निधीतून राष्ट्रीय महामार्गाची कामे, लातूरकरांसाठी 300 कोटी रूपयाचे सुप्पर स्पेशालिटी हॉस्पिटल, गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवठा यासह माता-भगिणींचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मोफत स्वच्छतागृह व उज्ज्वल योजना राबविण्यात आलेली आहे. अशा एक नाही तर अनेक योजना राबवून देशाला विकासाच्या ऊंचीवर नेहून ठेवण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या या विविध विकास योजनेची माहिती सर्वसामान्याला व्हावी या दृष्टिकोणातून भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहरजिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, शहर संघटक सरचिटणीस मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विशाल नगर भागातील साई मंदिर येथून “विकासतीर्थ बाईक रॅली”चा शुभारंभ करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक – महात्मा गांधी चौक- गंजगोलाई – आण्णाभाऊ साठे चौक, स्वामी विवेकानंद चौक, गरूड चौक मार्गे शहरातील सम्राट चौक, गुळ मार्केट, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये “विकासतीर्थ बाईक रॅली”चा समारोप करण्यात आला.

यावेळी या रॅलीमध्ये सहभागी गाड्यापैकी पुढच्या गाडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिकात्मक रूप धारण केलेले चाकूरकर सर यांना उभे करण्यात आल्यामुळे प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीच “विकासतीर्थ बाईक रॅली”मध्ये सहभागी झाले असल्याचा आनंद कार्यकर्त्यातून दिसून येत होता. यावेळी भाजपाचे सरचिटणीस दिग्वीजय काथवटे, संजय गिर, सतीश ठाकूर, शिवसिंह सिसोदिया, ज्योतीराम चिवडे, प्रताप शिंदे, आबा चौगुले, संगम कोटलवार, भाजयुमोचे सरचिटणीस अॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घाडके, संतोष ठाकूर, विशाल सोनवणे, गजेंद्र बोकन, वैभव डोंगरे, ऋषिकेश जाधव,पंकज शिंदे, पंकज देशपांडे, राहूल भूतडा, युवा मोर्चा मंडळाध्यक्ष काका चौगुले, राजेश पवार, पांडूरंग बोडके, प्रेम मोहिते, रवी लवटे, धनु आवस्कर, संतोष तिवारी, व्यंकटेश हांगरगे, आकाश बजाज, महादेव पिटले, गौरव बिडवे, गोविंद सूर्यवंशी, मंदार कुलकर्णी, आदित्य फफागिरे, निखील शेटकार, प्रथमेश गंभीरे, चैतन्य फिस्के, तन्मय पवार, ओम राठोड, बालाजी खमामे, अभिषेक यादव यांच्यासह भाजयुमो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.
—————————————————–