22.9 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeराजकीय*भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लातूर दौरा*

*भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लातूर दौरा*

राज्यात लातूरचा दौरा प्रभावी होणार – आ. रमेशआप्पा कराड

        लातूर दि.१५ – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे हे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लातूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन असून लातूरचा दौरा राज्यात प्रभावी होईल असेच नियोजन केले जाणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.

          भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्ष संघटनात्मक आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नूतन प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे हे संपूर्ण राज्याचा जिल्हा निहाय दौरा करीत आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने दौऱ्याची आखणी केल्याने या दौऱ्याला प्रत्येक जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच किंवा सहा तारखेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा लातूर दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक १५ नोव्हेंबर मंगळवार रोजी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात झाली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हा प्रभारी संतोषआप्पा मुक्ता, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

          प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांच्या लातूर दौरा अनुषंगाने माहिती देताना मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे म्हणाले की, दिवसभराचा हा दौरा असून या दौऱ्यात दिवसभरात कोणते काय कार्यक्रम घ्यायचे याची रूपरेषा प्रदेशाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाचा जिल्हा संघटनात्मक मेळावा, भाजयुमोची बाईक रॅली, विविध बैठका, पत्रकारांशी वार्तालाप, युवा शाखेचे उद्घाटन, केंद्र शासनाच्या लाभार्थ्याकडून “धन्यवाद ……. मोदीजी” अशा आशयाचे पोस्ट कार्ड लिहून घेणे, बूथ स्तरावरील बूथ कमिटीची बैठक, नवमतदारांशी संवाद साधने, नियोजित जिल्‍हा भाजपा कार्यालय इमारत भूमिपूजन आदि कार्यक्रमाचा त्यात समावेश आहे अशी माहिती दिली.

           जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यावेळी बोलताना म्हणाले की, मा. चंद्रशेखरजी बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच लातूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे जोरदार भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असून लातूरचा हा दौरा राज्यात एक आगळावेगळा आणि प्रभावशाली ठरणारा असेल. या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या नियुक्त करून अनेकांवर जबाबदारी दिली जाईल असे बोलून दाखविले.

          राज्यात विविध जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे मोठे स्वागत होत असून लातूरच्या कार्यक्रमाचे राज्यात वेगळेपण दिसावे यासाठी ज्यांना जी जबाबदारी मिळेल त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण पाडावी असे अरविंद पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखविले.

          प्रारंभी लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी बैठकीची रूपरेषा मांडून प्रदेश अध्यक्षांचा हा दौरा यशस्वी करावा असे सांगितले, तर या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे यांनी केले या बैठकीस लातूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे जिल्हा पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष व इतर अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]