घनसरगावला गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसवाल्यांनी काय दिले
विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे आ. रमेशआप्पा कराड यांचे प्रतिपादन
लातूर दि.२० :- राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठेही विकासाची कामे होत असल्याचे दिसून येत नाही. विकासाचा सगळा निधी सत्ताधारी पुढाऱ्यांनी फस्त केला. गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसवाल्यांनी घनसरगावला काय दिले असा प्रश्न उपस्थित करून गेल्या अडीच ते तीन वर्षात तब्बल १ कोटी ५५ लक्ष रुपयांची विकास कामे झाली असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले

रेणापूर तालूक्यातील मौजे घनसरगाव येथील मातंग समाज आणि बौद्ध समाज बांधवांसाठी प्रत्येकी १२ लक्ष रुपये खर्चाच्या २ सभागृहाचे भूमिपूजन, आमदार निधीतून बसविण्यात आलेल्या ३ लक्ष रुपयाच्या पथदिव्यांचे लोकार्पण, खासदार आणि आमदार निधीतून गावांतर्गत झालेल्या १४ लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण, घनसरगाव ते घनसरगाव फाटा दरम्यानच्या रस्त्याचे ४० लाख रुपये खर्चाच्या डांबरीकरण कामाचा लोकार्पण आणि या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या ७ लक्ष रुपये खर्चाच्या पोलसह एलईडी पथदिवे बसविणे कामाचा शुभारंभ, घनसरगाव तांडा येथील २१ लक्ष रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ, दहा लक्ष रुपये खर्चाची शाळा दुरुस्ती आणि त्याचबरोबर सात लक्ष रुपयाच्या नवीन वर्ग खोली बांधकामाचा शुभारंभ यासह विविध विकास कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते नुकताच झाला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब कापसे हे होते तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, ओबीसी आघाडीचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुका अध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, रेणापुरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, पंचायत समितीचे उपसभापती आनंत चव्हाण, पस सदस्य चंद्रकला इंगोले, श्रीकृष्ण मोटेगावकर, वसंत करमोडे, श्रीकृष्ण पवार सिद्धेश्वर मामडगे, कार्यक्रमाचे संयोजक सरपंच शरद दरेकर, उपसरपंच प्रवीण शिंदे, अँड श्रीकांत सूर्यवंशी, प्रा. उपेन्द्र पवार, हनुमंत पवार, धनराज शिंदे, सुरेश जाधव, प्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, माधव शिंदे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने देशाला विकास पुरुष पंतप्रधान लाभला असून त्यांच्याच माध्यमातून देशात आणि राज्यात रस्त्यासह विकासाची विविध कामे सुरू आहेत असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी अनैसर्गिक युती करून केवळ वसुलीचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणीही सुखी नाही. अतिरिक्त ऊस प्रश्नामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना स्वतःला जाणते राजे म्हणून घेणारी मंडळी आज कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला विधान भवनात काम करण्याची संधी पक्षाने दिली. त्यापूर्वी राज्यात भाजपाची सत्ता असल्याने लातूर ग्रामीण मतदारसंघात कोट्यावधीची विकास कामे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. घनसरगाव या गावासाठी आमदार खासदार निधीसह जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासाची कामे मंजूर केली. यापुढील काळातही घनसरगावच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका, व्यायामशाळा बांधून देऊ अशी ग्वाही देऊन आ. रमेशआप्पा कराड यांनी शरद दरेकर सारखा प्रामाणिक, कर्तत्वान, निस्वार्थी तरुण गावच्या विकासासाठी धडपड करीत आहे. त्याच्या पाठीशी गावकऱ्यांनी राहावे त्याला साथ द्यावी असे आवाहन केले.

प्रारंभी अँड दशरथ सरवदे, अभिषेक आकनगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सरपंच शरद दरेकर यांनी आ. रमेशआप्पा कराड यांच्यामुळेच गावच्या विविध विकास कामाला निधी उपलब्ध होऊ शकला असे बोलून त्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी समाज मंदिर व इतर कामे मंजूर केल्याबद्दल बौद्ध समाज, मातंग समाज आणि मुस्लिम समाज बांधवांनी आ. कराड यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानंदा दरेकर यांनी केले या कार्यक्रमास घनसरगाव येथील महिला. पुरुष. तरुण यांच्यासह इतर अनेक गावातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




