27.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeराजकीय*भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीणच्‍या ७० गावासाठी ५...

*भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीणच्‍या ७० गावासाठी ५ कोटीचा निधी मंजूर*

       लातूर दि.११ – लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावच्या विकास कामासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने ७० गावासाठी ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मिळाल्‍याने अनेक गावच्‍या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी आ. कराड यांचा पुष्‍पगुच्‍छ देवून, सत्‍कार करून आभार व्‍यक्‍त केले. 

         राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी गावांतर्गत मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावासाठी निधी मिळावा याकरिता सातत्याने वेळोवेळी पाठपुरावा केला.

        आ. रमेशआप्पा कराड यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून लातूर ग्रामीण मतदार संघातील ७० गावासाठी ५ कोटी रुपये खर्चाची विकास कामे मंजूर झाली आहेत. त्यानुसार रेणापूर तालुक्यातील ३१ गावासाठी २ कोटी २१ लाख १८  हजार रुपये, लातूर तालुक्यातील ३० गावासाठी २ कोटी १० लाख ८६ हजार रुपये तर औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील ९ गावासाठी ६७ लाख ९६ हजार रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. 

निधी त्यात रेणापूर तालुक्यातील वांगदरी, मोटेगाव, मोरवड, भोकरंबा, बिटरगाव, टाकळगाव, गरसुळी, खरोळा, तळणी, मोहगाव, माणूसमारवाडी, नरवटवाडी, रामवाडी ख, जवळगा, मुसळेवाडी फावडेवाडी दिवेगाव कोष्टगाव, पानगाव, आरजखेडा, आनंदवाडी, दर्जीबोरगाव, आसराचीवाडी, चाडगाव, वाला बावची, सिधगाव, गव्हाण, कोळगाव, ईटी, निवाडा लातूर तालुक्यातील रामेश्वर, कारसा, काटगाव, बोडका, गादवड, सारसा, चिंचोली ब, मुरुड, चिकलठाणा, बामणी, भाडगाव, सलगरा ब, भोयरा, चिंचोलीराववाडी, सावरगाव, गांजूर, वाकडी, टाकळी, भातखेडा, सोनवती, मुशिराबाद, रामेगाव, येळी, हिसोरी, दिंडेगाव, टाकळी, तांदुळवाडी, कासारखेडा, एकुर्गा आणि ममदापूर औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील टाका, शिंदाळा, शिवली, कवठा, भादा, समदर्गा, बोरगाव न, रिंगणी, वरवडा या गावात मंजूर निधीतून सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, समशान भूमी शेड, सभामंडप यासह विविध कामे होणार आहेत. सदरील निधी मंजूर करून आणला त्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचे लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावच्या सरपंचासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]