14.7 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeराजकीय*भाजपा लातूर जिल्ह्याक्षपदी आ. कराड यांची फेरनिवड करावी*

*भाजपा लातूर जिल्ह्याक्षपदी आ. कराड यांची फेरनिवड करावी*

जिल्हाध्यक्षपदी आ. कराड यांची पून्हा 

निवड करावी भाजपाच्या बैठकीत ठराव

जिल्हाभरात विशेष जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवावे- प्रा. किरण पाटील

लातूर दि.२३- गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात आ. रमेशअप्पा कराड यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगले आणि प्रभावी काम केले असून लातूर जिल्हा भाजपाच्या कामाची वेळोवेळी प्रदेश भाजपाने दखल घेतली आहे. सध्या राज्यात जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु असून प्रदेश भाजपा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल तरीही लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी आ. रमेशअप्पा कराड यांची फेर निवड करण्यात यावी असा ठराव भाजपाच्या जिल्हा बैठकीत आ. अभिमन्यू पवार यांनी मांडला त्यास माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील अनुमोदन दिले. दरम्यान भाजपाचे विशेष जनसंपर्क अभियान लातूर जिल्ह्यात प्रभावीपणे व सक्षमपणे सर्वांनी यशस्वी करावे असे आवाहन प्रदेश भाजपाचे चिटणीस प्रा. किरण पाटील यांनी केले.  

लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवार दि. २३ मे २०२३ रोजी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी प्रदेश भाजपाचे चिटणीस प्रा. किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. अभिमन्यू पवार, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, बांबू लागवड समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशा पटेल, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार गोविंदआण्णा केंद्रे, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. या बैठकीस भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष यांच्यासह सर्व अपेक्षित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना प्रदेश चिटणीस प्रा. किरण पाटील म्हणाले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्त्वातील केंद्र शासनाला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्ताने पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जून २०२३ या दरम्यान देशभर विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका, शक्तिकेंद्र आणि बुथ स्तरावर संपर्क से समर्पन, जाहीर सभा, पत्रकार परिषद, बुद्धीवंतांचे संम्मेलन, सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्तींचा मेळावा, व्यापारी संम्मेलन, जेष्ठ कार्यकर्त्यांसमवेत संवाद, विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांचे संम्मेलन, आंतरराष्ट्रीय योग दिन यासह विविध कार्यक्रम घेण्यात येतील अशी माहिती देवून हे विशेष जनसंपर्क अभियान सक्षमपणे यशस्वी करावे असे आवाहन केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड हे अभ्यासू आणि सक्षम आहेत. पक्षाचे अत्यंत प्रभावी काम केल्याने त्यांची परत जिल्हाध्यक्ष म्हणून निवड व्हावी यासाठी आपण प्रदेश भाजपाकडे विनंती करु असेही प्रा. किरण पाटील यांनी बोलून दाखविले.

मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पक्षाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केले त्यामूळेच प्रदेश भाजपाचे विविध कार्यक्रम जिल्हाभरात यशस्वी करु शकलो. सर्वांच्या मेहनतीमूळेच लातूर जिल्हा भाजपाच्या कामात राज्यातील पहिल्या पाच मध्ये आहे. असे सांगून यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, येणारा काळ निवडणूकीचा असल्याने दिलेली जबाबदारी सर्वांना पार पाडावीच लागेल. प्रदेश भाजपाच्या सुचनेनूसार प्रत्येक विधानसभेत साठ हजार सरल अ‍ॅपची नोंदणी करावी. लाभार्थ्यांच्या घरोघरी जावून धन्यवाद मोदीजी असे पत्र लिहून घ्यावेत, बुथ सशक्तिकरण अभियान प्रभावीपणे यशस्वी करावे असे आवाहन केले. 

या बैठकीत राज्य शासनाच्या अभिनंदनाचा व राजकीय ठराव मांडताना आ. अभिमन्यू पवार म्हणाले की, महाविकास आघाडीची काळीकुट्ट कारकीर्द संपविण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याग केला. गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार, शेतकर्‍यांना एक रुपयात पीकविमा, लेक लाडकी योजना, शेतकर्‍यांसाठी शेततळे, ठिबक, हरीतगृह यासह विविध योजना सौरउर्जीकरण व जलयुक्त शिवारचे पुनरुज्जीवन विविध समाजासाठी स्वतंत्र्य महामंडळाची स्थापना, आरोग्य सुविधा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, विविध स्मारक आणि तीर्थक्षेत्र विकासाठी कोट्यावधीची तरतुद यासह अनेक योजनांची प्रभावी अमलबजावणी करुन राज्यातील शिंदे-फ़डणवीस सरकारने पुन्हा राज्याची गाडी विकास पथावर आणली आहे. केंद्रातील नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सामान्य माणुस केंद्र बिंदू माणून अनेक विकासाच्या योजना सुरु केल्या आहेत त्याबद्दल अभिनंदन केले. जिल्हाध्यक्ष बाबतचा पक्षाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. आ. रमेशअप्पा कराड यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी संभाळून काम केले. पुढचे तीन वर्ष काम करण्याची त्यांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी प्रदेश भाजपाकडे विनंती करु असेही आ. अभिमन्यू पवार यांनी बोलून दाखविले. या ठरावाला माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी अनुमोदन दिले. आ. रमेशअप्पा कराड हेच जिल्हाध्यक्ष असावेत अशी जिल्ह्यातील बहुतांशी कार्यकर्त्यांची ईच्छा आहे. येणार्‍या निवडणूका आ. रमेशअप्पा कराड यांच्याच नेतृत्वात व्हाव्यात अशी विनंती नेत्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

या बैठकीत बांबू लागवड समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशा पटेल यांनी बांबू लागवडीचे महत्व सांगून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेल्या विविध निर्णयाची माहिती दिली. प्रारंभी प्रदेश भाजपाचे चिटणीस प्रा. किरण पाटील यांचा लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्यासह इतर अनेकांनी यथोचित सत्कार करुन स्वागत केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]