भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
आ. रमेशअप्पा कराड यांच्याकडून अभिवादन
लातूर दि.१४-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास आ. रमेशअप्पा कराड यांच्यासह आ. अभिमन्यू पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हा सरचिटणीस विक्रम काका शिंदे, रामचंद्र तिरुके, त्र्यंबक गुटे, लातूर लोकसभा समन्वयक तुकाराम गोरे, लातूर विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, जिल्हा उपाध्यक्ष सतिश अंबेकर, भागवत सोट, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, माजी उपसभापती अनंत चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.




