लातूर दि. १५– जगातील लोकप्रिय नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून आठ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विकास रथ बाईक रॅलीचे लातूर तालुक्यासह भादा सर्कलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. या रॅलीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि भाजपा नेते राजेश कराड भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले सहभागी झाले होते.
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केंद्र शासनाने नुकतीच आठ वर्षे पुर्ण केली. सबका साथ, सबका विश्वास, सबाका विकास आणि सबका प्रयास या उक्तीनुसार पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी घरकुल, उज्वला गॅस, शेतकरी सन्मान, आयुष्यमान भारत, अटल पेंशन, मोफत राशन, किसान क्रिडीट कार्ड, मुद्रा लोन यासह अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. या योजनेचा लाखो नव्हे तर करोडो गरजू देशवाशीयांना लाभ मिळाला. या सर्व योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विकासरथ बाईक रॅली काढण्यात येत असून संपुर्ण जिल्हाभर या रॅलीचा प्रवास होत आहे.

लातूर तालुक्यातील बारा नंबर पाटी येथील हनुमान मंदिरापासून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात निघालेल्या या बाईक रॅलीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते आपल्या बाईकला पक्षाचा ध्वज लावून घोषणा देत सहभागी झाले होते. ही रॅली लातूर तालुक्यातील बारा नंबर पाटी, साखरा पाटी, मुरुड अकोला, रामेगाव पाटी, बोरगाव काळे, निवळी, ढाकणी, एकुर्गा येथून औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील भेटा, नकुलेश्वर बोरगाव, भादा, ब-हाणपूर मार्गे औश्याकडे रवाना झाली.

या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे भागवत सोट, बन्सी भिसे, साहेबराव मुळे, विजय काळे, सुधाकर कराड, राजकिरण साठे, सुरज शिंदे, वैभव सापसोड, सुधाकर गवळी, धनराज शिंदे, आनंत कणसे, अनंत चव्हाण, भैरवनाथ पिसाळ, समाधान कदम, ज्ञानेश्वर जुगल, किरण मुंडे, काशिनाथ ढगे, गोपाळ पाटील, विनायक मगर, महादेव मुळे, गुणवंत कारंडे, अशोक सावंत, गोविंद मुंडे, बालाजी गवळी, शुभम खोसे, पप्पू घुट्टे, भरत कराड, दत्ता सप्ताळ, संतोष जगताप, अरविंद सुरकुटे, बालाजी गवळी, बापुराव बिडवे, गोपाळ पवार, अमर पिंपरे, बालाजी मुळे, गोविंद नांदे, मारूती शिंदे, तुकारम मुळे, गोपीनाथ मुळे, सतिष कात्रे, बालाजी साळूंके, किशोर भोकरे, वाजीद पठाण, कमलेश निलंगेकर, शरद मिसाळ, सुरेश भोसले, श्रीनिवास साळूंके, संजय बनसोडे, योगेश लटूरे, तानाजी गायकवाड, देवराव मोहिते, श्रीराम जावळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांसह तरुणांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला होता.





