36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीयभाद्यातून निवडूण गेलेल्‍या लोकप्रतिनिधींनी केले तरी काय? उलट शेतकऱ्यांची आडवणूकच केली

भाद्यातून निवडूण गेलेल्‍या लोकप्रतिनिधींनी केले तरी काय? उलट शेतकऱ्यांची आडवणूकच केली

भादा येथील कार्यक्रमात भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांचे प्रतिपादन

    लातूर दि.०६- भादा सर्कल मधून निवडूण गेलेल्‍या लोकप्र‍तिनिधींनी मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक तरी  केली का? त्‍यांनी कोणती विकासाची कामे केली असा प्रश्‍न उपस्थित करून जनतेच्‍या प्रश्‍नाची सोडवणूक करण्‍याची त्‍यांची नितिमत्‍ताच नाही. उलट ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांची आडवणूक, पिळवणूक करण्‍याचे काम केले. मस्‍तवाल भ्रष्‍ट नेत्‍यांना गरीबांच्‍या वेदना काय असतात याची जाणीव नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी भादा येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. 

    लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मौजे भादा येथे आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या स्‍थानिक विकास निधी अंतर्गत श्री. विठ्ठल रूक्‍मीणी मंदिरा समोर बांधण्‍यात आलेल्‍या सभागृहाचे उदघाटन रविवारी झाले त्‍यावेळी आ. कराड ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भादा येथील सरपंच सौ. मिनाताई दरेकर या होत्‍या भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस विक्रम शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, वसंत करमुडे, महेंद्र गोडभरले, श्रध्‍दा जगताप, आरती राठोड, अनुसया फड, रेवनअप्‍पा पाटील, सतिष कात्रे, पद्ममाकर चिंचोलकर, गुणवंत कारंडे, बालाजी शिंदे, राजकिरण साठे यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

    आपल्‍या सर्वांच्‍या आशिर्वादाने मला आमदार म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली. मिळालेल्‍या  पदाच्‍या माध्‍यमातून गोरगरीब जनतेचे आश्रू पूसण्‍याचे आणि गेल्‍या १०-१५ वर्षापासून वंचित असलेल्‍या या भागातील गावागावात वाडीतांडयात विकास कामे करण्‍याचा प्रामाणिकपणे प्रयत्‍न करीत असल्‍याचे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी राशन मोफत दिले, शेतकऱ्यांना दरमहा मदत केली, गोरगरीबांसाठी अनेक योजना सुरू केल्‍या मात्र गेल्‍या अडीच वर्षात राज्‍य शासनाकडून कस‍लीच मदत मिळाली नाही. या सरकारने फक्‍त वसूलीचेच काम केले असून मंत्र्याला जेलमध्‍ये जावे लागते हे महाराष्‍ट्राचे दुर्दैव आहे. 

    भादा सर्कल मधून भाजपाचा हक्‍काचा लोकप्रतिनिधी जिल्‍हा परिषदेत निवडून आला असता तर विकासाची अनेक कामे झाली असती. औशाच्‍या भाजपा आमदारांनी जनहिताची अनेक प्रभावी कामे करून दाखविली. जे अभिमन्‍यूला करता आले ते लातूर ग्रामीणच्‍या आमदाराला का करता आले नाही असा प्रश्‍न  उपस्थित करून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, मांजरा परिवाराच्‍या कार्यक्षेत्रातील ऊस मार्च पुवीच संपला असता मात्र बाहेरचा ऊस आणून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची आडवणूक आणि पिळवणूक करण्‍याचे पाप केले. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून प्रतिदिन दोन हजार टन गाळप क्षमतेचा गुळपावडर प्रकल्‍प  उभारण्‍याचा आम्‍ही निर्णय घेतला असून येत्‍या दसऱ्याला काम सुरू होइ्रल अशी त्‍यांनी माहिती दिली. 

    सत्‍तेच्‍या माध्‍यमातून पैसा आणि पैशाच्‍या जोरावर पुन्‍हा सत्‍ता हे चक्र थांबले पाहिजे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण आणि ओबीसीचे हक्‍काचे आरक्षण राज्‍यातील निष्‍क्रीय महाविकास आघाडी सरकारने घालवले. याचा जाब विचारण्‍याची वेळ आली आहे. तेव्‍हा येत्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या  निवडणूकीत भाजपाला साथ देवून सत्‍ताधाऱ्यांना त्‍यांची जागा दाखवून द्यावी असेही अवाहन आ. रमेशअप्‍पा  कराड यांनी केले. 

    प्रारंभी हभप रेवणअप्‍पा पाटील यांनी प्रास्‍ताविक भाषणातून सर्वसामन्‍यांना तत्‍परतेने भेटणारा, गोरगरीब माणसाला अडचणीत मदत करणारा एकमेव नेता रमेशअप्‍पा कराड आहेत असे बोलून दाखविले तर सभागृहाच्‍या उद्धाटन निमित्‍ताने भादा येथील ग्रामस्‍थांनी वाजत गाजत फटाक्‍यांची अतिषबाजी करून मोठया उत्‍साहाच्‍या वातावरणात आ. कराड यांचे जंगी स्‍वागत केले. या कार्यक्रमास महिला, पुरूष मोठया संख्‍येनी उपस्थित होते. 

    यावेळी अक्षय भोसले, पांडूरंग धोत्रे, अर्जून लटूरे, भरत उबाळे, नंदकुमार जाधव, हबीब शेख, सहदेव हजारे, सुर्यकांत पाटील, सत्‍यशिला बनसोडे, दिनकर माळी, मन्‍मथ पाटील, शाहूराज गवळी, रेवण गायकवाड, नामदेव बनसोडे, योगेश लटूरे, तानाजी गायकवाड, संजय बनसोडे, उजा गवळी, गोविंद पाटील, बालाजी साळूंके, गोरख बनसोडे, शामल गायकवाड यांच्‍यासह अनेकांनी कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी मेहनत घेतली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]