23.9 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeउद्योग*भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज वितरण*

*भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज वितरण*


पीएम-सुरज पोर्टलचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्यप्रणालीव्दारे लाभार्थ्यांशी साधला संवाद

लातूर, दि.14 (वृत्तसेवा: )- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी देशातील विविध राज्यातील 526 जिल्ह्यामधून 1 लाख लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात आले. तसेच पी.पी.ई. किट, आयुष्यमान भारत हेल्थकार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लाभार्थ्यांशी दुरदृश्यप्रणालीव्दारे संवाद साधला. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थी उपस्थित होते.


या कार्यक्रमामध्ये लातूर येथील 50 लाभार्थ्यांना पी.पी.ई. किट चे वितरण करण्यात आले, 8 लाभार्थींना आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच संत रोहिदास चर्मकार व चर्मौद्योग विकास महामंडळाच्या एकुण 14 लाभार्थ्यांना मंजूरीपत्र प्रदान करण्यात आले.


उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ, नायब तहसिलदार परविण पठाण, समाज कल्याणप्रादेशिक उपआयुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रविण खडके, लोकशाहीर अण्णाभाऊसाठे विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक रमेश दरबस्तेवार, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक पी.एम.झोंबाडे, डॉ.बालाजी गोरे, पी.एम.जे.ए.वाय. महानगरपालिका श्री. पिडगे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम.एन.कांबळे आदींची यावेळी उपस्थित होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]