गणपतराव देशमुख यांचे निधन
महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक काळ आमदार म्हणून राहिलेले ( ११ वेळा ) आणि आयुष्यभर एकाच पक्षात राहिलेले म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन…. भावपूर्ण श्रद्धांजली….!!
सलग 11 वेळा सांगोला ( जि.सोलापूर ) तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आलेले सर्वात जेष्ठ नेते .
* सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल मध्ये वयाच्या 95 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास.
* सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं होत.
* शेकाप पक्षाचं नेतृत्व करीत होते.
* विधानसभेतील सर्व आमदार त्यांचा मान ठेवत.
* साधी राहणी आणी उच्च विचारसरणी.
* बिनकामाची शासकीय कागतपत्रे रद्दीत विकून सदर रक्कम सरकार दरबारी जमा करीत असत.
* अतिशय दुष्काळी तालुका असलेल्या सांगोला मतदार संघात पाणी आणलं.
* कांही वर्षे सरकार मध्ये मंत्री होते.
* विधानसभेतील सर्व पक्षाचे मार्गदर्शक.
* सतत ST ने प्रवास करीत.
* सामान्यामधला असामान्य माणूस.
* अथक परिश्रम करणार व्यक्तिमत्व.
* 72 चा दुष्काळ अनुभवलेल व्यक्तिमत्व.
* कधीही आवाज चढवून बोलण नव्हतं.
* महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री पाहिलेले.
* संसदीय लोकशाहीतील पितामह.
* शेकाप पक्षाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ.
* मंत्रिपद गेल्यावर एक तासात शासकीय बंगला सोडला.
* गणपतराव ऊर्फ आबासाहेब देशमुख सभागृहात हात वर केल्यावर सभापती त्यांना आवर्जून बोलण्यास सांगत.
* विधीमंडळात कांही घटनात्मक पेचप्रसंग उदभवल्यास अभ्यासू व संयमी नेतृत्वाची झलक सतत दिसत होतं.
* कामगार,शेतकरी,मंजूर,कष्टकरी यांचा प्रश्न मांडण्यात सतत आग्रही.
* विधानसभेतील लोकशाहीचे विद्यापीठ.
* १९६२ मध्ये पहिली निवडणूक लढविली.
अशा योगी व्यक्तिमत्वाला ईश्वर सद्गती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना… 🙏











