लातूर – शहरातील सरकारच्या सार्वजनिक इमारती, कॉलेजच्या भिंती, बसस्थानक मधील भिंती, उड्डाणपूलाच्या भिंती अशा ठिकाणी भित्तीपत्रके लावून शहर विद्रुप करण्याचे काम केले जात आहे.
गेल्या काही दिवसांत हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
२०१९ मध्ये मनपा लातूर तर्फे शहर सुशोभीकरण अंतर्गत विविध थीमस द्वारे रंग रंगोटी ची कामे करून विविध आकर्षक चित्र रंगविण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण शहर सुशोभित झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपूलाच्या सर्व भिंती अशा भित्तीपत्रका मुळे विद्रुप झाल्या होत्या.
व्यावसायिक, मेस, वैद्यकीय, नोकरीविषयक, हॉटेल, क्लासेस, भाड्याने देणे घेणे असे विविध भित्तीपत्रके चिटकवली आहेत.
यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसमोर शहराचे विद्रुप चित्र निर्माण होत आहे, सोबत चौकाचे सौदर्य बाधीत झाले होते.
ही बाब लक्षात घेऊन
ग्रीन लातूर वृक्ष टीमने
आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात
Poster Free Latur city
भित्तीपत्रके मुक्त शहर
हा उपक्रम राबवून
उड्डाणपूलाच्या भिंतीवरील भित्तीपत्रके काढून घेतली.
उड्डाणपुलाच्या भिंती पाण्याने धुवून घेतल्या.
यामुळे उड्डाणपुलाच्या कॉलम वर जी चित्रे रेखाटली होती ती पूर्ववत दिसायला लागली.
रंगविलेल्या भिंतींनी व चित्रांनी मोकळा श्वास घेतला
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट प्रमुख महेश गेलडा यांचे सह
डॉ. पवन लड्डा, डॉ. भास्करराव बोरगावकर, पदमाकर बागल, ऍड वैशाली लोंढे-यादव, मनीषा कोकणे, दीपाली राजपूत, पूजा पाटील, दयाराम सुडे, आकाश सावंत, अभिषेक घाडगे, राहुल माने, नागसेन कांबळे, सिताराम कंजे, गणेश सुरवसे, शुभम आवाड, आकाश चिल्लरगे
यांनी परिश्रम घेतले.
ग्रीन लातूर वृक्ष टीम
नम्र विनंती
महानगरपालिका यांना नम्र विनंती
स्वच्छ लातूर, सुंदर लातुर, हरित लातूर करिता
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या अविरत १२८० दिवसांपासून सुरू असलेल्या कार्याची दखल घेऊन यानंतर पुढे भित्तीपत्रका मुळे लातूर शहर विद्रुप होऊ नये याची काळजी घ्यावी., ही मोहीम शहरात इतरत्रही राबवावी.
स्वच्छ सर्वेक्षण जानेवारी २०२३ मध्ये भित्तीपत्रके मुक्त शहर याकरिता गुण आहेत.