भालकी तालुक्यातील तुगाव ( हालसी ) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात सापाचा तीन दिवस मुक्काम..
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जमला भाविक-भक्तांचा मेळा
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात एका सापाने तीन दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे.लिंबाच्या झाडावर दिवसभर एकाच ठिकाणी फणा काढून राहतो आणि राञ झाली की,तिथेच मुक्काम करतो.भाविक-भक्तांनी गर्दी करूनही तो आपली जागा सोडत नाही.परिणामी,श्रध्दाळू भक्तगणांनी सापाला दैवरूपी म्हटले आहे.इतकेच नव्हे,तर दर्शनासाठी रीघ लावली आहे.

दरम्यान,दि.08 जानेवारीपासून सापाचा भालकी तालुक्यातील तुगाव ( हालसी ) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या समोर असलेल्या लिंबाच्या झाडावर मुक्काम आहे.तिथे अनेकांनी गर्दी केली,तरी साप जागचा हलायला तयार नाही.सर्पमिञाला बोलावून त्याला दूर नेऊन सोडले,तरी तो पुन्हा मंदिर परिसरातच त्याच झाडावर,त्याचठिकाणी येऊन बसला असल्याचे मंदिर विश्वस्त भगवान रामतीर्थ यांनी सांगितले.अशा वेळी श्रध्दाळू भाविक-भक्तांनी हा चमत्कार संबोधून गर्दी करायला सुरूवात केली.दि.10 जानेवारीला तर गावातील श्री महालक्ष्मी मंदिरापासून शिवेवरील लक्ष्मी मंदिरापर्यंत हलगीसोबत वाजत-गाजत महालक्ष्मी मंदिरात नैवेद्य दाखविण्यात आला.तसेच,सापालाही नैवेद्य ठेवले,परंतु सापाने नैवेद्यही खाल्लेला नाही.दरम्यान,सोमवारी दुपारी 04 वाजेनंतर याठिकाणाहुन साप निघुन गेला.
नैवेद्य,दूध सापाचे अन्न नाही…!
ग्रामस्थ माधव पिचारे म्हणाले की,सापाने नैवेद्य व दूध प्राशन केले नाही.कारण,ते त्याचे अन्नच नाही.गावातील श्री महालक्ष्मी हे जाज्वल्य मंदिर आहे.तेथे दर तीन वर्षांनी मोठा उत्सव भरतो.याञाही भरते.आता त्या सापाचा मुक्काम किती दिवस राहतो,याकडे सर्वांचेच लक्ष आहे.











