क्षणभंगुर आयुष्य
आपल्या आयुष्यात पर्मनंट असं काहीच नसतं.. मी म्हणते आपल्याच आयुष्यात काय तर सृष्टी मध्येच पर्मनंट असं काहीच नसतं..सगळं काही वेळेनुसार आणि गरजेनुसार बदलत राहतं.. म्हणतात ना, वेळेनुसार बदल हा प्रकृतीचा नियमच आहे..आणि तो तुम्ही आम्ही स्विकारलाच पाहिजे …
“हा पण बदल हा नैसर्गिक,गरजेपुरताच आणि प्रामाणिकच आत्मसात केला पाहिजे” बस हा नियम मात्र आपणच स्वतः ला लागू करवून घेतला पाहिजे…आजचं धावपळीचं जग आपल्याला एवढं फास्ट बदलायला भाग पडत आहे ना, कि आपल्याला क्षणभर थांबून विचार करायलाही वेळ नाहीये …नेमकं कुठे,किती,कशासाठी बदल करवून घ्यायचा आहे आणि तो खरच तेवढा महत्त्वाचा आहे का?..
बर बदल म्हणजे नेमकं काय होत आहे ते थोडक्यात – तुम्ही जॉबला आहात, टेक्नॉलाजीमध्ये बदल गरजेचा..
आता दुसरी बाजू, माझा अमुक ओळखीचा अमुक कंपनीमध्ये अमुक पॅकेजवर जॉब करतोय, वीकऐन्डला एन्जॉय करतोय, आणि माझ्या आयुष्यात विशेष असं काहीच चालू नाहीये.. मला कंपनीमध्ये बदल केला पाहिजे ..मला दैनंदिन रूटीनमध्ये बदल करावा लागेल… थोडक्यात काय गरज नसताना त्या वेळेला बदल करवून घ्यायचा कि नाही हे आपणच ठरवलं पाहिजे…मुंग्यांनी मेरूचा पर्वत गिळावा का?…आपल्यासाठी यथेच्छ बदल पेलवणारा आणि गरजेचा आहे की नाही अगोदर ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे ,पण आपण प्रवाहाच्या ओघात एवढं जोरात धावत आहोत की छोट्या छोट्या गोष्टी सुटून जात आहेत, हे आपल्याला कळतही नाहीये.. आपलं आयुष्य म्हणजे आपण रोज जगत असलेली आपली दिनचर्याच..आजचा दिवस आनंदाने जात आहे ना मग त्यात खरच बदल हवा का, ह्याचा विचार होणे गरजेच..
जसं सकाळच्या ट्रेंडच भूत रात्रीपर्यंत संपायला येतं..
तसंच सकाळच दुःख रात्रीपर्यंत विसरायला होतं..
सरते शेवटी काय तर, आयुष्यात बदल करायला हवा की नको हे ज्याचे त्याने त्याच्या गरजेनुसार ठरवावेे
मनांतरी
लेखन. …
केतकी गोपाळ कुळकर्णी
टीप:दर रविवारी नवनवीन सदर घेऊन येत आहोत.