अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या पदरी पुन्हा मोघम घोषणाच-माजी मंञी .आ संभाजी पाटिल निलंगेकर
लातूर ;दि.
मराठवाड्याच्या विकासासाठी कोणतीही दिशादर्शक पायाभूत सुविधांची तरतूद याही वर्षी करण्यात आलेली नाही. मुंबई – पश्चिम महाराष्ट्रात निधीचा ओघ पाहता, महाराष्ट्राचा नकाशा महाविकास आघाडीला देण्याची आवश्यकता आहे,अशी प्रतिक्रिया माजी मंञी आ संभाजी पाटिल निलंगेकर यांनी व्यक्त केली.
शेतकरी वर्गाला जुन्याच घोषणा नव्याने ऐकविण्यात आल्या आहेत. अवर्षण, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकरी वर्गासाठी कोणतीही भरीव तरतूद उपलब्ध करून दिली नाही.
एस. टी. महामंडळ, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काहीही विशेष या अर्थसंकल्पात नाही. मराठवाडा व विदर्भात दूरगामी परिणाम साधता येईल, यासाठी कोणत्याही योजनांचा अंतर्भाव देखील यामध्ये करण्यात आलेला नाही.
आणखीन एक निराशाजनक अर्थसंकल्प अशीच याची व्याख्या करता येईल अशी टिका माजी मंञी आ संभाजी पाटिल निलंगेकर यांनी केली.




