22.3 C
Pune
Sunday, February 15, 2026
Homeसाहित्य*मराठवाड्यातील पहिले कुमार साहित्य संमेलनाचे जनकल्याण निवासी विद्यालयात आयोजन*

*मराठवाड्यातील पहिले कुमार साहित्य संमेलनाचे जनकल्याण निवासी विद्यालयात आयोजन*

लातूर -जनकल्याण निवासी विद्यालय व ज्ञान प्रबोधिनी -छात्र प्रबोधन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर व परिसरातील ४०० विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून मराठवाड्यातील पहिले कुमार साहित्य संमेलन  जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ बु येथे दि. ८ ऑक्टोबर रोजी साकार होणार आहे.

   या संमेलनाचे उद्घाटन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रकल्प अध्यक्ष श्री. प्रकाशजी लातुरे, छात्र प्रबोधन मासिकाचे संपादक श्री.महेंद्रभाई सेठीया तर समारोप प्रसंगी शिवशाहीर श्री .संतोषजी सांळूके, प्रांत उपाध्यक्ष डॉ. रमेशराव जोशी, श्री . महेंद्रभाई सेठीया , संमेलन प्रमुख श्री.उमेशजी सेलूकर उपस्थित राहणार आहेत. 

 यावेळी विद्यार्थ्यांसाठी कविता,कथा , प्रवासवर्णन, व्यक्तीचित्रण, नाट्यछटा, पुस्तक रसास्वाद, संवाद लेखन, अनुभवपर , माहितीपर या विषयावर आधारित  लेखन कार्यशाळा व कविता सादरीकरण, गोष्ट कशी सांगावी सादरीकरण शाळा होणार आहेत.

यासाठी प्रसिद्ध साहित्यिक श्री.रेणू पाचपोर , श्री .मुकुंदराज कुलकर्णी, श्री.फारुख काझी, श्रीमती.संगिताताई बर्वे, मृणालिनी कानिटकर – जोशी, क्षितिज देसाई, स्वाती ताडफळे, केलास दौंड, बालाजी इंगळे,शंतनू पांडे  मान्यवर लेखक संमेलनात उपस्थित राहणार आहेत.

    यामध्ये पुस्तक प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याची  भिंत,  हैद्राबाद मुक्तीसंग्रामावर आधारित पोवाडा, नाटिका, तसेच विद्यार्थी साहित्य सादरीकरण होणार आहे.

 यासाठी पूर्ण तयारी म्हणून शहरातील केशवराज विद्यालय, ज्ञानप्रकाश विद्यालय, सोमाणी विद्यालय, लॉर्ड कृष्णा स्कूल, जि. प्रशाला खरोळा,भुईसमुद्रगा, हरंगुळ, मुरूड, नाईचाकूर, श्री श्री रविशंकर विद्यालय या विद्यालयात साहित्य मेळावे घेऊन विद्यार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तसेच छात्र प्रबोधन दूत योजनेअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

  संमेलनाच्या तयारीसाठी जनकल्याण निवासी विद्यालयातील प्रकल्प कार्यवाह राजेशजी सुगरे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वरजी सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी श्री रवींदजी पुर्णपात्रे, अधीक्षक श्री दत्ता माने, शिक्षक -पर्यवेक्षक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]