39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*मराठवाड्यातील सर्वात मोठया मुरूड ग्रामपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्‍ता*

*मराठवाड्यातील सर्वात मोठया मुरूड ग्रामपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्‍ता*

लातूर जिल्‍हयात सर्वाधिक सव्‍वादोनशे ग्रामपंचायती

भाजपाच्‍या ताब्‍यात; राज्‍यशासनाच्‍या कामाची पावती

लातूर दि.२०– ग्रामपंचायत निवडणूकीच्‍या निकालात लातूर जिल्‍हयातील तब्‍बल २३८ ग्रामपंचायती ग्रामीण भागातील जनतेनी भारतीय जनता पार्टीच्‍या ताब्‍यात दिल्‍या असून मराठवाडयात सर्वात मोठी असलेल्‍या  मुरूड ग्रामपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्‍ता आली आहे. गेल्‍या पाच महीन्‍यात राज्‍यातील मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाची ग्रामीण जनतेनी पोच पावती दिली असल्‍याची प्रतिक्रीया भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली. 

लातूर जिल्‍हयातील ३५१ ग्रामपंचायतीसाठी गेल्‍या १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. सरपंच पदाची निवड जनतेतून करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतल्‍यामुळे गावागावात मोठया उत्‍साहाच्‍या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. झालेल्‍या मतदानाची मतमोजणी २० डिसेंबर रोजी जिल्‍हयातील सर्वच तालुक्‍याच्‍या ठिकाणी पार पडली. या निवडणुकीत जिल्‍हयातील ३५१ ग्रामपंचायती पैकी भारतीय जनता पार्टीच्‍या तब्‍बल २३८ उमेदवारांनी बाजी मारत विजयाचा पताका फडकवीला आहे तर कॉग्रेसचे ७६, राष्‍ट्रवादी कॉग्रेस २१, शिंदे सेना गटाचे ६, ठाकरे सेना गटाचे ४, अपक्ष ५ सरपंच विजयी झाले आहेत तर एक जागा आरक्षणा अभावी रिक्‍त राहीली आहे.

 ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरील बुथ स्‍तरावरील कार्यकर्त्‍यांची निवडणूक असल्‍याने या कार्यकर्त्‍यांना ताकत आणि हिम्‍मत देण्‍यासाठी भारतीय जनता पार्टीने नियोजनबध्‍द पध्‍दतीने आखणी केली. त्‍यानुसार जिल्‍हयातील भाजपाचे नेते माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्‍यू पवार, माजी मंत्री विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, पाशा पटेल, अरविंद पाटील निलंगेकर, गणेशदादा हाके, दिलीपराव देशमुख, गोविंदअण्‍णा केंद्रे, गुरूनाथ मगे, बब्रूवान खंदाडे यांच्‍यासह पक्षाच्‍या लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्‍या पदाधिका-यांनी गावागावात नियोजन करून घेतलेल्‍या मेहनतीमुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत लातूर जिल्‍हयात भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिध्‍द केले आहे. 

राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्‍या नेतृत्‍वात सत्‍तेवर आलेल्‍या भाजपा सेना युतीच्‍या सरकारने गेल्‍या पाच महिन्‍यात शेतकरी, कष्‍टकरी, सर्वसामान्‍य जनतेला आधार देण्‍याचा त्‍याचबरोबर राज्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्‍वपुर्ण निर्णय घेतले. पाच महिन्‍यात केलेल्‍या कामाची पावती ग्रामीण भागातील जनतेनी ग्रामपंचायत निवडणुकीच्‍या माध्‍यमातून दिली असल्‍याचे सांगून भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी हा विजय भाजपा सेना युतीचा मोठा विजय आहे. या विजयाबद्दल सर्व मतदारांचे आभार व्‍यक्‍त केले. 

मराठवाडयात सर्वात मोठी असलेल्‍या लातूर तालुक्‍यातील मुरूड येथील ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीत मतदारांनी एकहाती सत्‍ता भाजपाच्‍या ताब्‍यात दिली आहे. या निवडणुकीत भाजपा सरपंचपदाच्‍या उमेदवार श्रीमती अमृता अमर नाडे यांच्‍यासह १७ सदस्‍यांपैकी १६ सदस्‍य भाजपाच्‍या पॅनलचे विजयी झाले आहेत. भाजपाचे जिल्‍हा चिटणीस अमर नाडे यांचे या निवडणुकीतील प्रचारादरम्‍यान दुर्दैवी दुःखद निधन झाले होते. अमर नाडे यांनी पाहीलेल्‍या मुरूड सर्वांगीन विकासाचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी मुरूड येथील मतदारांनी भाजपाच्‍या पॅनलला भरभरून मताधिक्‍य दिले त्‍याबद्दल सर्व मतदाराचे आ. रमेशअप्‍पा कराड यांनी आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]