25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeठळक बातम्या*मराठा समन्वय परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉ. शारदा जाधव यांची नियुक्ती*

*मराठा समन्वय परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉ. शारदा जाधव यांची नियुक्ती*

.

    लातूर -  मराठा समन्वय परिषदेच्या राष्ट्रीय कार्य समितीने नुकत्याच नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मा. कमलेश पाटील यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. शारदा जाधव-माने यांची मराठा समन्वय परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करून नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. 
      गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श महिला पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप सन्मानपत्र, अष्टक्षेत्री पुरस्कार इ. त्या शैक्षणिक संप्रेषणमध्ये डॉक्टरेट आहेत. किंबहुना २०१६ च्या डी.एड.पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांचे शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन हे डी.एड.साठी पाठ्यपुस्तक आहे. त्यांनी शासनाचा पायलेट प्रोग्राम राबविला आहे. १८ वर्षे प्राचार्य राहून कार्यक्षम योग्यताधारक असंख्य भावी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे मोठे काम केले आहे. अनेक राष्ट्रीय कामात त्यांचा सहभाग आहे. संस्कृती प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या अहोरात्र धडपडत आहेत. बहि:स्थ शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना पदवीधर करून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अनेक पदावर त्या कार्यरत आहेत. त्या उत्तम लेखक व वक्ता आहेत. 
      समन्वय परिषदेच्या माध्यमातून त्या कर्नाटक राज्य प्रभारीचा पदभार सांभाळून कर्नाटक राज्यासाठी वेळ देणार आहेत. या नियुक्तीबद्दल जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटक प्रा. मयुराताई देशमुख, मराठी अभिवृध्दी निगमचे अध्यक्ष माजी आमदार मारुतीरावजी मुळे, कर्नाटक राज्याचे मेसेसचे अध्यक्ष रघुनाथराव जाधव, माधवराव कादेपुरकर, अॅड. जगदीश जगताप, ज.तु.चे बालाजी जाधव, विवेक सौताडीकर, एम. एम. जाधव, दिलीप धुमाळ, राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, प्रयास ग्रुप व सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी व शिक्षक वर्गाने डॉ. शारदा जाधव-माने यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. 
      हे काम विशिष्ट जातीसाठी नसून सबंध समाजासाठी करण्याची भावना डॉ. शारदा जाधव-माने यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]