‘ मराठी साहित्य संमेलन आपल्या दारी ‘
योजने अंतर्गत विविध शाळेत जावून मराठी साहित्य संमेलनाचे निमंञण देण्यात आले.
कथाकथनास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
निलंगा,-(प्रतिनिधी )-
95 व्या अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाच्या वतीने आयोजित ‘संमेलन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे निलंगा तालुक्यात विविध ठिकाणी संमेलनाचे निमंञण देण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन निलंगा येथील श्री.शिवाजी विद्यालयात जि.प.शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण सोळुंके यांच्या हस्ते झाले,अध्यक्षस्थानी मु.अ.मनोहर डाकरे होते.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या कथाकथनाने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आसू अन गालावर हसू उमटले.प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षक पतसंस्थेचे संचालक संजय कदम.गोविंद सावरगावे,पत्रकार विक्रम हलकीकर उपस्थित होते.

प्रारंभी कै.श्रीपतराव सोळुंके व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विक्रम हलकीकर यांनी प्रास्तविक केले. गोविंद सावरगावे यांनी संमेलनाविषयी माहिती दिली. अरुण साळुंके यांनी मराठी साहित्य संमेलन दिनाक 22.23.24 एप्रिलला होत असुन त्या संमेलनाचा अस्वाद घ्यावा. सममेलनास उपस्थिती लावावी असे आवाहन केले .गुडसूरकर यांनी सादर केलेल्या कथेने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत क्षणभर आसू आणि क्षणभर हासू निर्माण केले. सतीश गंपले यांनी सूत्रसंचालन तर एन.पी.बिरादार यांनी आभार मानले.

निलंगा येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख पुरी होत्या.संजय कदम यांनी प्रास्तविक केले.केळगाव येथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात धनंजय गुडसूरकर ,गोविंद सावरगावे,विक्रम हलकीकर यांनी संमेलनासंदर्भाने मार्गदर्शन केले.निटूरमोड येथील जि.प.शाळेत केंद्रप्रमुख बी.एन.पवार,मु.अ.आर.एन.धडे, साधनव्यक्ती जी.एम.कांबळे यांच्या उपस्थितीत धनंजय गुडसूरकर यांचे मार्गदर्शन झाले..शेडोळ येथील महाराष्ट्र मा. व. उच्च माध्यमिक
विद्यालयात मु.अ.एस.बी.कदम यांच्या अध्यक्षतेखाली रामदास केदार वगोविंद गारकर यांनी मार्गदर्शन केले.
गोपीनाथ काळे यांनी सूत्रसंचालन
डी. एन. सुर्यवंशी यांनी आभार मानले.
वडगाव जि. प. प्राथमिक शाळेत गोविंद गारकर व प्रा.रामदास केदार यांनी साहित्यसंमेलन आपल्या दारी हा उपक्रम संपन्न केला.अध्यक्षस्थानी मु.अ.संजय कदम होते.निलंगा तालुक्यात संमेलन आपल्या दारी या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.