मसलगा धरणावर ग्रामस्थांचे जलउडी आंदोलन…*

0
394

अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाल्याने

*मसलगा धरणावर ग्रामस्थांचे जलउडी आंदोलन…*

 *तहसीलदार व लोकप्रतिनिधीची मध्यस्थी…*

*2016 च्या आठवणी झाल्या जाग्या…*

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाचे दरवाजे दि. 16 ऑक्टोबर रोजी सुमारास अचानक पणे चुकीच्या पध्दतीने उघडल्यामुळे सोळनदी काठावरील शेतकर्‍यांच्या शेतातील अतिवृष्टी व पुरातुन शिल्लक असलेले सोयाबीन व उसाचे अतोनात नुकसान झाले झालेल्या नुकसानी संदर्भात शेतकर्‍यांनी शाखा अभियंत्ता यांना विचारणा केली असता शेतकर्‍यांना उदधटपणे बोलल्यामुळे दि. 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मसलगा ग्रामस्थांनी जलउडी आंदोलन मध्यम प्रकल्पावर जाऊन सुरु केले तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू होते आंदोलना वेळी पोलीस प्रशासन दाखल झाले

*तहसीलदार व लोकप्रतिनिधींची मध्यस्थी…*

या आंदोलनाची माहिती निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांना मिळताच मसलगा येथील ग्रामस्थांची फोनद्वारे संपर्क साधात आपल्या मागण्या आम्ही विचारात घेऊन तुम्हा सर्व शेतकऱ्यांच्या आडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधीकारी पृथ्वीराज यांच्यासोबत तातडीची बैठक बोलावून आपला प्रश्न निकाली काढू अशी शेतकऱ्यांची समजूत काढत आश्वासन दिले याच वेळी भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी ही फोन द्वारे तातडीने आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे मध्यम प्रकल्पावरील सर्व आडचणी सोडवण्याचे आश्वासन दिलेे.  या आश्वासनानंतर तात्पुरते हे आंदोलन माघार घेण्यात आली.

निलंगा तहसीलदार गणेश जाधव व भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या आश्वासनं मुळे हे आंदोलन तात्पुरते माघार घेण्यात येत असून आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही मसलगा ग्रामस्थं तीव्र आंदोलन करतील *असे सरपंच प्रतिनिधी रमेश पाटील म्हणाले*

शनिवारी सायंकाळी 6 वा. मसलगा मध्यम प्रकल्प 100% टक्के भरून गेटच्या वरून पाणी पडत असल्याचे आपण प्रकल्प कर्मचाऱ्यांना सांगूनही रात्रीच्या वेळी अचानकपणे पाणी सोडल्याने असा प्रकार घडला असल्याचे मध्यम प्रकल्पा शेजारी जमीन असलेले *शेतकरी विलास पाटील* यांनी या आंदोलनात ही माहिती दिली

अतिरिक्त पाणी का सोडले याची माहिती शेतकऱ्यांनी शाखा अभियंता यांना विचारले असता उद्धटपणे बोलणाऱ्या अशा अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे *शेतकरी बाबासाहेब पाटील* यांनी आंदोलनाच्या वेळी मागणी केली आहे

अचानक पणे सोडलेल्या पाण्यामुळे अतिवृष्टीत सापडून राहिलेल्या सोयाबीन गंजीसह उसाचे उभे पीक ही आता वाहून गेले असून आम्हा प्रकल्पाचा खालील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नुकसान सहन करावे लागत असून आमचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा असा सवाल *शेतकरी गुरुनाथ जाधव व सतीश जाधव* यांनी यावेळी केला*प्रकल्पावरती कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आले*

*2016 च्या आठवणी झाल्या जाग्या…*

2016साली रात्रीच्या वेळी प्रकल्प ओरफ्लो झाला दरवाजे प्रकल्पाचे दरवाजे उघडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मसलगा ग्रामस्थांनी प्रकल्पाकडे धाव घेऊन शेकडो तरुणांच्या मदतीने प्रकल्पाचे गेट उचलून अनर्थ टाळला होता येथील कर्मचाऱ्यांची हलगर्जीपणा व सुविधांचा अभाव असल्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भभू शकते म्हणून 2016सालच्या वेळची परिस्थिती पुन्हा उद्भउनये याची वरिष्ठांनी दखल घेण्याचे गरजेचे आहे

*शाखा अभियंता गायब…*

मसलगा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडले याची माहिती विविध ग्रुप द्वारे शाखा अभियंत्यांनी दिली परंतु हे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात का सोडले असे ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी उत्तर दिले नाही व दिवसभर प्रकल्पावर येण्याची तसदीही घेतली नाही म्हणून शाखा अभियंता गायब असल्याची चर्चा मसलगा येथे दिवसभर रंगली होती

तसेच या प्रकल्पावर कायमस्वरूपी शाखा अभियंता व ऑपरेटर द्यावा व संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून असे अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यावीअशीही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

यावेळी सरपंच प्रतिनिधी रमेश पाटील, चेअरमन बाबासाहेब पाटील, व्हा. चेअरमन विलास पाटील, गुरुनाथ जाधव, बाबुराव जाधव, प्रल्हाद लोकरे, दिलीप पाटील, गुरुनाथ पिंड बापूराव पाटील मनोहर पिंड शेषराव पवार भागवत पिंड, श्रीधर मोहिते, गफुर सय्यद, नागनाथ नरहारे, प्रभाकर तेलंगे, पप्पू मुगळे, व्यंकट पाटील आदीसह 100 शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होतो.

यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पानचिंचोली पोलीस चौकीचे बिट अंमलदार सुनिल पाटील, पोलीस सुर्यवंशी व निलंगा पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेचे नागमोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here