पंढरपूर, दि. 09 : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, , जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदीर समितीकडून भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची. तसेच वारी कालावधीत मंदिर समिती मार्फत करण्यात आलेले नियोजनाबाबत माहिती घेवून आवश्यकत्या सूचना दिल्या.
00000





