मुंबई ; दि.१८ ( प्रतिनिधी )-
महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांच्या अवतरण अष्टशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस बाबा यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
या शिष्टमंडळाने राज्यपालांना श्री चक्रधर स्वामींच्या कार्याची माहिती दिली तसेच श्रीक्षेत्र डोमेगाव व रिद्धपुर येथे भेट देण्याची विनंती केली.

दैनिक सकाळ माध्यम समूहाच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी राज्यपालांना सकाळ महानुभाव स्थान महात्म्य अभियानाची माहिती दिली.
निवृत्त माहिती संचालक
संचालक तथा न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी जातीप्रथा निर्मुलन,स्त्री पुरुष समानता, मराठी भाषा आणि साहित्य यातील
महानुभाव पंथाचे ऐतिहासिक योगदान या विषयी माहिती दिली.
महानुभाव पंथियांच्या कार्यात आपण निश्चितच आवश्यक ते योगदान देऊ,अशी ग्वाही राज्यपाल महोदयांनी यावेळी बोलताना दिली.
प्रारंभी राज्यपाल महोदयांच्या सहस्त्र चंद्र दर्शन वाढदिवसाच्या निमित्ताने शिष्टमंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महात्मा हंसराजबाबा महानुभाव खामणीकर, महात्मा चेतन नागराज, ऍड तृप्ती बोरकुटे, बन्सीधर राजूरकर, महात्मा सागरदादा, साजन शेंडे, हरिहर पांडे आदी उपस्थित होते.
- टीम एनएसटी
☎️9869484800