पाच राज्यांचे निवडणूक निकाल लागले..
राजकीय विश्लेषण
उत्तरप्रदेश, मणिपूर मध्ये अपेक्षेप्रमाणे भाजप सत्तेत आली.. उत्तराखंड, गोवा येथे अपेक्षेपेक्षा चांगल्या रीतीने भाजप सत्तेत आली.. तर पंजाब मध्येही अपेक्षेपेक्षा चांगल्या रीतीने आप सत्तेत आली..
या सर्व निकालात सर्वात चर्चेत विजय आणि उदय आहे तो अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा पंजाब मधील.. न भूतो न भविष्यती असा हा विजय आहे.. अरविंद केजरीवाल आणि आप यांचं हे वैशिष्ट्यच आहे की ते असाच निर्णायक विजय मिळवतात.. 2 वेळा दिल्लीत आणि आता पंजाब मध्ये.. हा पक्ष आणि याची कार्यपद्धतीच वेगळी आहे.. सामान्य माणसांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करून ते मत मागतात.. त्यातल्या त्यात सामान्य माणसांचे जे 2 मूलभुत प्रश्न आहेत शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही विषय त्यांनी उत्तम रित्या हाताळले आहेत.. स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य हे त्यांनी दिलं आहे.. त्याचे सकारात्मक परिणाम ही त्यांना निवडणूक मतदानात मिळाले आहेत.. त्यात पुन्हा ही केडर बेस पार्टी आहे..

पंजाबच्या निकालातल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चन्नी, अमरिंदर सिंग, सिद्धु आणि इतर दिग्गजांचा झालेला पराभव.. तो ही सामान्य माणसांकडून.. एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या मेकॅनिकने एका मुख्यमंत्र्याला हरवाव आणि पक्षाच्या एका सामान्य कार्यकर्तीने प्रदेशाध्यक्षाला हरवाव हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि लोकांना अभिप्रेत असलेली लोकशाही आहे.. आणि हे कुठे ही घडू शकत शर्त ही आहे की लोक रेटा तसा पाहिजे..

पंजाब मध्ये पराभूत काँग्रेस झाली आहे.. निवडणुकीच्या पुढे पुढे मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय खूप आश्चर्यकारक होता.. त्यानंतर अचानक चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय ही तेवढाच आश्चर्यकारक होता.. सिद्धू, जाखड असताना चन्नी यांना निवडणं अनेकांच्या भुवया उंचावणार होत.. पण नंतर चेन्नी ज्या पद्धतीने मीडिया समोर येत होते अस वाटलं की एक दलित, सामान्य कुटुंबातील स्ट्रीट स्मार्ट नेतृत्व पक्षाला विजयी करून आणेल.. पण हा नेत्यांमधील गोंधळ काही थांबला नाही आणि तो लोकांना भावला नाही असे एकूण दिसते.. हे निर्णय घेताना खूप हिंमतीचे वाटले पण गोंधळलेले पण वाटत होते.. काँग्रेसने अमरिंदर घालवले, अमरिंदर यांनी काँग्रेस.. मुख्यमंत्री बदला नंतर सिद्धू यांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही, इथेच गोंधळाला सुरवात झाली आणि त्याची परिणीती पराभवात झाली..
पंजाब मध्ये दलित समाजाची 30% च्या वर मते आहेत, चन्नी clp नेते राहिलेले आहेत हे गणित घालून पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केले.. पण ही सगळीच गणिते चुकली.. जात बघून पद देण्यापेक्षा योग्यता बघून पद दिले पाहिजे हा धडा या निकालाने दिला आहे..
त्यात किसान आंदोलनाचा ही काही परिणाम तिथे दिसला नाही.. माझं तर पूर्वीपासून अनुभवाने एक मत आहे की दोन घटकांच्या जीवावर कधीही राजकीय गणित घालू नयेत.. एक शेतकरी आणि दुसरं त्या त्या राज्यातील प्रमुख जात.. याला दक्षिणेतील 2 राज्य अपवाद आहेत.. शेतकरी कधी मत देताना एक होत नाही जसा व्यापारी होतो.. आणि त्या त्या प्रदेशातील प्रमुख जातीही कधी एक होत नाहीत जशा छोट्या जाती होतात.. म्हणून या आंदोलनाचे परिणाम ना पंजाब मध्ये दिसले ना उत्तरप्रदेशात..
भाजपने उत्तरप्रदेश मध्ये दणदणीत विजय मिळवला.. परत सत्तेत आले.. जबरदस्त कामगिरी.. महागाई, बेरोजगारी, दलित अत्याचार, मंत्री पक्षांतर, आमदार पक्षांतर कशाचाच परिणाम होऊ दिला नाही.. योगी परत निवडून आले आहेत म्हणजे त्यांनी राज्यात काहीतरी चांगले काम केले असेल असे आपण मानावे.. अखिलेश यांच्या सारख्या तरुण राजकारणी व्यक्तीसाठी हा पराभव निराश करणारा असेल.. पण ऐन निवडणुकीत मेहनत करून हवा तर तयार होते पण निवडणुकीच्या झाडाच मतदान रुपी फळ पदरात पडत नाही हे त्यांना लक्षात आलं असेल.. अशीच मेहनत 5 वर्ष विरोधी पक्ष म्हणून केली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असत..
उत्तरप्रदेशात काँग्रेसची अवघड जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर होती.. त्यांनी मेहनत पण खूप घेतली.. प्रत्येक सामाजिक प्रश्नात त्या मैदानात उतरल्या पण यश आलं नाही.. महिलांना प्राधान्य दिलं, चांगला प्रचार केला पण जमलं नाही.. त्यांना ही खूप निराशा झाली असेल..
काँग्रेसला खरी निराशा उत्तराखंड आणि गोव्यात झाली असेल.. जिंकू शकले असते असे हे दोनच राज्य होते.. पण जमलं नाही त्यांना.. उत्तराखंड मध्ये तर अखंड मुख्यमंत्री बदलून सुद्धा भाजप जिंकली.. करू नयेत त्या सर्व चुका करून सुद्धा भाजप जिंकली.. कदाचित उत्तरप्रदेशचा प्रभाव तिकडे ही झाला असेल.. पण संधी असताना तिला हस्तगत करण्याचा आक्रमकपणा काँग्रेसला दाखवता आला नाही..
आप चा उदय झाला आहे.. प्रामाणिक, सामान्य माणसांच्या दैनंदिन प्रश्नाचं राजकारण करणारा हा पक्ष. त्याचा उदय हा लोकशाहीसाठी सूर्योदय आहे.. तर भाजपची घोडदौड चालू आहे.. निवडणूक यंत्रणा जबरदस्त राबवली गेली, कडक निर्णय घेतले गेले, अचूक अंदाज बांधले गेले आणि विजय मिळवला गेला.. काँग्रेस हा काही राज्य सोडले तर भाजपसाठी विषयच नाही असे वाटते पण काही पक्ष भाजपला जमू देत नाहीयेत हे ही सत्य आहे आणि त्यात प्रमुख नाव घ्यावं लागेल ते ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांच.. तस शरद पवार साहेबांनी पण भाजपवर डाव उलटवला आहे.. पण दिल्ली मध्ये राहून, भाजपच्या छातीवर बसून त्यांना न जमू देण्याचा पराक्रम केजरीवाल यांनी केला आहे..
पुढे काय? आणि खासकरून काँग्रेसचे काय? हा प्रश्न भाजपच्या विजयापेक्षा मोठा झाला आहे असे प्रसारमाध्यमात बघितल्यावर वाटते.. काँग्रेसला योग्य दिशेने अपार कष्ट करण्याची गरज आहे.. मुख्य म्हणजे जातिगत सामाजिक विषयातून, गणितातून बाहेर येऊन लोकांच्या उन्नतीचे मूलभूत प्रश्न घेऊन काम करण्याची गरज आहे.. काँग्रेसने सचिन पायलट यांच्या सारखे नाविन्यपूर्ण काही करू शकणारे नेते देशपातळीवर आणले पाहिजेत.. एक अविरत कार्य करणारी यंत्रणा उभी केली पाहिजे.. मागील गुजरात निवडणुकीत अशोक गेहलोत यांच्या सोबत राहुल गांधी यांनी जी हवा तयार केली होती तसा प्रवास पाहिजे.. नेमकं आकलन आणि काय केलं पाहिजे याचा अंदाज असणे फार महत्वाचे आहे.. काँग्रेस सगळीकडेच आहे पण कुठेच नाही असे चित्र आहे.. आपण काहीतरी आहोत ही भावना घातक आहे, आपण कोणीच नाही राहिलो आहोत आणि कोणीतरी आपणाला व्हायचं आहे ही सिद्ध करणारी भावना उभारी देऊ शकेल..
या निकालाचे परिणाम महाराष्ट्रावर काय होतील? तर भाजप थोडी अजून आक्रमक होईल आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अजून थोडे सावध होतील आणि जवळ येतील.. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा फड उन्निस वीस करण्याचा प्रयत्न देवेंद्र करत आहेत पण एक शरद पवार साहेब आणि एक संजय राऊत आहेत त्यामुळे अडचण नाही.. बाकी ही जण विधिमंडळात थोडे आक्रमक झाले तर या दोघांना मदत होईल.. महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे.. भाजपच्या खऱ्या कमी खोट्या जास्त धोरणाला पुरून उरायचे असेल तर आक्रमकता हाच एक मार्ग आहे..

अभिजित देशमुख