25.2 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeसांस्कृतिक*महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस प्रतिसाद*

*महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस प्रतिसाद*

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धा 

लातूर- नांदेड केंद्रावर उस्फूर्त प्रतिसादाने गाजली

लातूरला सांघीकसह एकुण ६ पारितोषीके●●

पारितोषीक विजेते संघ व सर्वच कलाकारांचे 

माजी मंत्री, आ. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून कौतूक आणि अभिनंदन

लातूर (प्रतिनिधी) १५ डिसेंबर २२ :

    महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेला यावर्षीही लातूर – नांदेड केंद्रावर कलाकार आणि नाटयरसीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सांघीकसह लातूरला ६ पारितोषीके मिळाली आहेत. परभणी येथील दानव नाटक प्रथम तर लातूर येथील अबीर गुलाल या नाटकास सांघीक व्दितीय पारितोषीक मिळाले असून या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत सर्व सहभागी नाटय कलावंताचे कौतूक करून पारितोषीक विजेते कलाकार व संघाचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

    लातूर ही शिक्षणाची आणि कलेची भुमी आहे. येथे नाटयरसीकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे येथील सांस्कृतिक गरज पाहता भविष्यात नाटय चळवळीला गती मिळावी यासाठी महाविकास आघाडी सरकार असतांना मागच्या वर्षी तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेचे लातूर येथे केंद्र मंजूर केले होते. लातूरला हौशी मराठी नाटय स्पर्धा केंद्र म्हणून निवड केल्यामुळे येथील कलावंतांची सोय झाली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक नाटके या केंद्रावर सादर झाली, सादर झालेल्या या नाटकांना भरघोस प्रतिसाद मिळाला.

लातूर – नांदेड केंद्रावर झालेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धा सन २०२२  – २३ या स्पर्धेत परभणी येथील गोपाळ फाऊंडेशनकडून सादर केलेल्या दानव नाटकास प्रथम पारितोषीक मिळाले तर लातूर येथील शकुतलादेवी सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अबीर गुलाल नाटकास व्दितीय पारितोषीक मिळाले असून या दोन्ही नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. क्रांती हुतात्मा संस्था परभणीच्या सृजन्मय सभा नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले आहे. या झालेल्या राज्यनाटय प्राथमिक फेरीतील स्पर्धेत लातूर येथील नाटयसंस्थानी मोठया उत्साहाने सहभाग घेतला.

अबीर गुलाल या नाटकासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे व्दितीय पारितोषीक प्रशांत जानराव यांना मिळाले तर अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे अभिनयाचे रौप्य पदक नाटक-अबीर गुलालसाठी लातूरचेच कानिफनाथ सुरवसे यांना मिळाले आहे. नेपथ्याचे व्दितीय पारितोषीक लक्ष्मण वाघमारे यांना (नाटक- मिशन-२९) या नाटकासाठी मिळाले आहे. स्नेहा शिंदे आणि वैष्णवी वाघ या गुणी स्त्री कलावंतांना अभिनयाचे प्रमाणपत्र किरवंत आणि मिशन – २९ या नाटकासाठी मिळाले. लातूर केंद्रावर उत्कृष्ट संयोजनाचे काम ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी समन्वयक म्हणून केले. या सर्व विजेत्याचे अभिनंदन करून त्यांना पूढील यशासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]