ज्येष्ठा गौरींचे घरोघरी सोनपावलांनी आगमन
कांही महिलांनी कोरोनाचे संकट दूर करा असे साकडे गौरी पूजनानिमित्ताने घातले….
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- निलंगा शहर व ग्रामीण भागात यंदा श्री गणरायाच्या आगमनापाठोपाठ ज्येष्ठा गौरीचे आगमन रविवारी घरोघरी झाले.सोनपावलांनी आलेल्या ज्येष्ठा गौरींचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.या सणानिमित्त उत्साहाचे वातावरण होते.

शिवाय,दिवसभर बाजारात पूजेच्या साहित्यासाठी गर्दी होती.महालक्ष्मीचा सण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.या सणानिमित्त रविवारी सोनपावलांनी आलेल्या ज्येष्ठा गौरींचे घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले.

शहर व ग्रामीण भागात घरोघरी मखर सजावट करण्यात आली असून,आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.सोमवारी गौरींचे पूजन करण्यात येत असते.सोमवारी गौरींचे पूजन संपन्न झाले.त्यानिमित्त त्यास १६ भाज्यांचे पंचपक्वान्न,फले,मिठाई,आदींची नैवेद्य दाखविण्यात आले.श्री गणरायाच्या आगमनासाठी जशी तयारी करण्यात आली होती,तशीच तयारी घरोघरी लक्ष्मी आगमनाची होत असते.

त्याअनुषंगाने,सोमवारी पूजन करण्यात आले.कोरोना नियमावलीचे पालन करीत गौरींचे स्वागत झाले आहे.नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आल्याने महिलांमध्ये ऊर्जेचा स्ञोत म्हणावे लागेल असेच कांही महिलावर्गांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.











