26.8 C
Pune
Saturday, March 28, 2026
Homeराजकीय*महाविकास आघाडीमुळे विकासकामांना गती*

*महाविकास आघाडीमुळे विकासकामांना गती*


आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन

उमरगा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण—लातूर : महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर कोरोना, अतिवृष्टी, पुर अशा एकामागून एक आपत्ती आल्या. या आपत्तींचा सामना करीत ग्रामीण भागातील विकासकामांना राज्य सरकारने मोठ्या कौशल्याने गती दिली. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचे काम केले, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी येथे केले.
लातूर तालुक्यातील उमरगा येथे सभागृह, सिमेंट रस्ता यासह विविध विकासकामांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी संवाद साधला.


याप्रसंगी जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन प्रमोद जाधव, विलास साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन रवींद्र काळे, बाजार समितीचे मनोज पाटील, प्रताप पाटील, दगडूसाहेब पडीले, बादल शेख, युवराज जाधव, सचिन दाताळ, संभाजी रेड्डी, बाळासाहेब, त्र्यंबकराव शिंदे, एस. आर. सावंत, अभय देशपांडे, भास्कर कांबळे, सरपंच राजेश खाडप, उपसरपंच गोविंद खाडप, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, सरपंच महादेव साळुंके, विलास चामे, युवराज विर, बालाजी मेकले, शिक्षक गुट्टे, मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने नागरिकांची काळजी घेतली. आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याचे काम ग्रामीण भागात झाले. त्यामुळेच नागरिकांना तातडीने उपचार मिळाले आणि आजही मिळत आहेत. कोरोनाच्या काळात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत अशा विविध पातळ्यांवर चांगले काम झाले. हे कौतुकास्पद असेच आहे, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.–(चौकट)काँग्रेसचे विचार तळागाळात पोचवून पक्षाची ताकद वाढवा—लातूर ग्रामीण मतदारसंघात आणि लातूर जिल्ह्यात लोकहिताची विविध विकासकामे झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेस पक्षाला आपण सर्वांनी साथ द्यावी. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोचवून पक्षाची ताकद वाढवावी. महाविकास आघाडी सरकार आपले आहे. त्यामुळे सरकार आल्यापासून लातूरच्या विकासकामाची गती वाढली आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे आणखी विकासकामे करून घेण्यासाठी काँग्रेसला बळ द्यावे, असे आवाहन आमदार श्री. धिरज देशमुख यांनी केले.—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]