निटूर येथील ग्रामदैवत श्री सादनाथांच्या चरणी भाविक-भक्तांची महाशिवराञीनिमित्ताने मांदियाळी..
निलंगा,-( प्रतिनिधी )-
निलंगा तालुक्यातील निटूर येथील पंचक्रोशीतील जागृृत देवस्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात भाविक-भक्तांची मांदियाळी दिसून आली.उंच टेकडीवरती वसलेले हे मंदिर जागृत असल्याने याठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतात अशी अख्याईका आहे.पहाटेपासूनचं,मंदिरात अभिषेकासह भाविक-भक्तांची गर्दी होती.

निटूर येथील ग्रामदैवत श्री सादनाथ मंदिर पंचक्रोशीतील असल्याने परिसरातील,जिल्ह्याबाहेरील,परराज्यातील भाविक-भक्त याठिकाणी श्री सादनाथांच्या चरणी आपला माथा टेकवण्यासाठी येत असतात.तसेच,विश्वस्त समितीकडून सकाळपासूनचं महाशिवराञी असल्याने फराळ,चहापानची उत्तम सोय केलेली होती.भाविक-भक्तांनी या फराळाचा प्रसाद म्हणून आस्वाद चाखला हे विशेषत्त्वाने पाहावयास मिळाले.या मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून चालू आहे.त्यामुळे याठिकाणी भाविक-भक्तांची आवक-जावक मोठ्याप्रमाणात दिसून आली.
प्रतिवर्षा प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन विश्वस्त समितीच्या वतीने अनेक सुश्राव्य किर्तनकार आणि भजनीमंडळासह साप्रदायाकतेचा ठेवा ठेवण्याचा सप्ताहा परिसरात गाजलेला असतो हे विशेषत्त्वाने पाहिले जाते.यावर्षी ह.भ.प.किर्तनकार नावाजलेले असल्याने सप्ताहाची जयत्त तयारी चालू आहे,असे विश्वस्त समितीचे अनिल सोमवंशी,पंकज कुलकर्णी,विजय देशमुख,बाळकृृष्ण डांगे यांनी सांगितले आहे.